Voter List Mapping : मतदार याद्या मॅपिंगसाठी पाच दिवसांची डेडलाईन

जिल्हाधिकारी कार्यालयात सुपरवायझर यांची प्रशिक्षण कार्यशाळा
Voter List Mapping
Voter List Mapping : मतदार याद्या मॅपिंगसाठी पाच दिवसांची डेडलाईनfile photo
Published on
Updated on

Five-Day Deadline for Voter List Mapping

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार याद्यांचे मॅपिंग आणि पडताळणीचे काम सुरू आहे. बीएलओमार्फत मतदारांच्या घरी भेटी देऊन हे काम केले जात आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी आता पाच दिवसांची डेडलाईन देण्यात आली आहे. ३० मार्च अखेरपर्यंत हे मॅपिंग आणि पडताळणीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुपारवायझर यांना दिले आहेत.

Voter List Mapping
Sambhajinagar voter list revision : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ॲक्शन मोडवर

जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये सुपरवायझर यांची प्रशिक्षण कार्यशाळा दोन सत्रांत आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षणात उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार नीलेश अपार उपस्थित होते. मतदार यादीतील नावाची पडताळणी, नवीन मतदाराचा समावेश, स्थलांतर झाले असल्यास नोंद घेऊन मतदाराच्या संमतीने कोणत्याही एका ठिकाणी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.

बीएलओमार्फत होणाऱ्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा सुपरवायझर यांनी घ्यावा, जेणेकरून निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील निवडणूक यादीचे मॅपिंगचे काम पूर्ण होईल, असे यावेळी सांगण्यात आले. मतदान केंद्रस्तरीय निरीक्षक यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, जिल्ह्याच्या मतदार यादी पुनरक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीचे मॅपिंग करण्याचे उद्दिष्ट ९० टक्के पर्यंत दि. ३० मार्च अखेर पूर्ण करावे. यासाठी सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असणारे घटक बीएलओ आणि सुपरवायझर यांना कार्यमुक्त करण्यात आलेले आहे. तसेच शासकीय सुटीदरम्यानही प्राधान्याने मतदार यादीचे मॅपिंग करण्याचे निर्देश स्वामी यांनी दिले.

Voter List Mapping
वाळूजमधील मतदार मॅपिग कॅम्पमध्ये गोंधळ, मतदार संभ्रमात

दोन अर्जाद्वारे माहिती भरून घेणार

एक हजार मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्रासाठी एक बीएलओ आणि दहा बीएलओच्या कामकाजासाठी एक सुपरवायझर नेमण्यात आले आहेत. सर्वांनी मॅपिंग करीत असताना मतदाराच्या घरी जाऊन दोन अर्ज देऊन माहिती भरून घ्यावी. ती माहिती एक अर्ज स्वतः कडे घेऊन २००२ सालच्या मतदार यादी सोबत माहितीची खातरजमा करावी. मॅपिंग करताना २००२ च्या मतदार यादीनुसार मतदाराचे नाव आले का तपासणे, ज्यांचे यादीत नाव नाही ते समावेश करणे, तसेच नवमतदार कोठे होते ते तपासणे आवश्यक आहे. हे करीत असताना याबाबत मतदाराना विचारणा करण्यात यावी. १८ वय असणारे मतदार यांच्या कुटुंबीयातील सदस्याची माहितीच्या आधारे यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे, असे बैठकीत सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news