जगात पुण्यात प्रथम साजरी झाली डॉ. आंबेडकर जयंती!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी
Ambedkar Jayanti 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, ज्ञानेश्‍वर खंदारे : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशात साजरी केली जात असली तरी, 14 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथमच डॉ. भीमराव आंबेडकर यांची भीम जयंती म्हणून साजरी केली. बाबासाहेबांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांचा सन्मान करणे आणि भारतातील सामाजिक न्याय आणि समानतेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे स्मरण करणे होय. डॉ. बाबसाहेब आंबेडकर केवळ मागासवर्गीयांच्या हक्कांसाठीच लढले नाहीत, तर पक्षपात आणि जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे महान समाजसुधारकही होते.

बाबासाहेबांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते केवळ मागासवर्गीयांच्या हक्कांसाठीच लढले नाहीत तर, जात, धर्म, पंथ आणि प्रदेशाच्या सीमा त्यांनी कायद्याने उद्ध्वस्त केल्या. जनार्दन सदाशिव रणपिसे हे बाबासाहेबांचे अत्यंत निष्ठावान अनुयायांपैकी एक होते. त्यांनीच 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू केली. भारतात 14 एप्रिल ही दरवर्षी अधिकृत सार्वजनिक सुट्टी असते. डॉ. बाबासाहेब दलित समाजाच्या समान हक्कासाठी लढायचे. याशिवाय भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला.

डॉ. आंबेडकरांनी 1951 मध्ये हिंदू कोड ऑफ वुमन एम्पॉवरमेंट विधेयक मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले. ते मंजूर झाले नाही तेव्हा त्यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांची पुनर्रचना करून छोट्या आणि आटोपशीर राज्यांमध्ये पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. जो 45 वर्षांनंतर काही प्रदेशांमध्ये प्रत्यक्षात आला. निवडणूक आयोग, नियोजन आयोग, वित्त आयोग, महिला आणि पुरुषांसाठी एकसमान नागरी हिंदू संहिता, राज्य पुनर्रचना, मोठ्या राज्यांचे लहान आकारात संघटन, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत अधिकार, मानवाधिकार, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, निवडणूक विभाग मजबूत केले. राजकीय संरचना मजबूत करण्यासाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि परराष्ट्र धोरणाचे ते निर्माते होय. बाबासाहेब राज्यसभेतून दोनदा खासदार म्हणून निवडून आले. 1990 मध्ये बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news