

Fire breaks out at Polycab Wires warehouse
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
साऊथ सिटीच्या समोर आणि म्हाडा कॉलनीच्या बाजूला असलेल्या रविवारी (दि.३) दुपारी ३.३० च्या सुमारास पॉलीकॅब वायर्सच्या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीची माहिती नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच, पदमपुरा आणि कांचनवाडी येथील अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. वायर्सचे गोदाम असल्याने आग वेगाने पसरण्याची व मोठे नुकसान होण्याची भीती होती. मात्र, जवानांनी पाण्याचा मारा करत आग वेळीच आटोक्यात आणली. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.