FDA Action : 'उत्तम उपहार गृह' वर एफडीएची कारवाई

अस्वच्छतेसह पुनर्वापराचे तेल, कृत्रिम रंगाचा बेजबाबदार वापर
FDA Action
FDA Action : 'उत्तम उपहार गृह' वर एफडीएची कारवाईfile photo
Published on
Updated on

FDA action against 'Uttam Uphar Gruh'

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील प्रसिद्ध इमरती-जिलेबी उत्पादक उत्तम उपहार गृह येथे ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) धडक तपासणीत उघड झाले. वारंवार वापरलेले तेल व वनस्पती तूप, अस्वच्छतेचा कळस, कृत्रिम रंगाचा बेजबाबदार वापर आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने एफडीएने गुरुवारी (दि.२३) आस्थापनेचा परवाना तात्काळ निलंबित करत दुकान सील केले.

FDA Action
Digital Arrest Scam : १८ दिवस डिजिटल अरेस्ट; वृद्धेला १२ लाखांचा गंडा

सेफ फूड, सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संबंधित आस्थापनेची तपासणी केली. यावेळी समोसे, भजी तसेच इमरती-जिलेबी तयार करण्यासाठी वारंवार वापरलेले खाद्यतेल आणि वनस्पती तूप (डालडा) पुन्हा वापरले जात असल्याचे निदर्शनास आले. टीपीसी मीटरद्वारे तपासणी केली असता तेलाचे रीडिंग ५८, तर वनस्पती तुपाचे ३६ इतके नोंदविण्यात आले. सुरक्षित मर्यादा २५ असताना ही पातळी अत्यंत धोकादायक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे तपासणीत सुमारे २५ ते ३० कामगारांकडे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र नसल्याचे आढळले. इडलीचे पीठ ड्रेनेजलाईनशेजारी उघड्यावर ठेवण्यात आले होते. तळण्याच्या जागेजवळ तंबाखूची पाकिटे, भिंतींवर थुंकल्याच्या खुणा आणि सर्वत्र अस्वच्छता दिसून आल्याने अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

FDA Action
Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

अन्न सुरक्षा नियमांचे अनेक गंभीर उल्लंघन आढळल्याने एफडीएने संबंधित आस्थापनेचा परवाना तात्काळ निलंबित करून दुकान सील केले. पुनर्वापर केलेले तेल आणि वनस्पती तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी कि. ल. झाडे आणि सहायक आयुक्त द. वि. पाटील यांच्या पथकाने केली.

अस्वच्छतेचा कळस !

तपासणीदरम्यान अन्न तयार करण्याच्या ठिकाणी झुरळांचा मुक्त वावर, भिंतींवर जाळे-जळमटे, काळपट तेलाचा थर, अस्वच्छ परिसर तसेच झाकण नसलेल्या कचराकुंड्या आढळल्या. खिडक्यांना जाळ्या नसल्यामुळे दूषित वातावरणात मिठाई तयार केली जात असल्याचेही उघड झाले. तसेच इमरती आणि जिलेबीमध्ये टार्दाझिन या कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याचे आढळून आले. मात्र, हा रंग किती प्रमाणात वापरायचा याची माहिती संबंधित कामगारांनाच नसल्याचे तपासणीत समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news