Farmer kidnapped : पैशाच्या वादातून शेतकऱ्याचे अपहरण; रात्रभर डांबून मारहाण

४० हजार अन् बॉण्ड लिहून घेतल्यानंतर सुटका
Sambhajinagar Crime |
Farmer kidnapped : पैशाच्या वादातून शेतकऱ्याचे अपहरण; रात्रभर डांबून मारहाणPudhari
Published on
Updated on

Farmer kidnapped over money dispute; Beaten and detained all night

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ऊसतोडीच्या पैशाच्या व्यवहारातून एका शेतकऱ्याचे आठ जणांनी अपहरण करून जबर मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.१५) वळदगाव परिसरात घडली. अप-हरणकर्त्यांनी शेतकऱ्याला थेट जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात नेऊन एका खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर ४० हजार रुपये उकळून आणि उर्वरित पैशासाठी बॉण्ड लिहून घेतल्यानंतरच दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची सुटका केली.

Sambhajinagar Crime |
उभ्या ट्रकला पाठीमागून दुचाकी धडकली, दोन ठार

अचिन जयंत चव्हाण आणि सचिन जयंत चव्हाण (दोघे रा. भासुनाईक तांडा, ता. अंबड, जि. जालना) यांच्यासह इतर सहा अनोळखी व्यक्ती अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर अपहरणासह विविध कलमांन्वये सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विलास गोविंद चव्हाण (३५, रा. गिरणेरा तांडा) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ विकास आणि आरोपी सचिन व अचिन चव्हाण यांच्यात ऊसतोडीच्या पैशांवरून व्यवहार झालेला होता.

यातूनच त्यांच्यात वाद सुरू होता. रविवारी (दि. १५) रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास विलास चव्हाण हे नेहमीप्रमाणे वळदगाव येथील साम्राज्य हॉटेलच्या मागे मिरची विकून आपल्या दुचाकीने कांचनवाडीकडे एकटेच जात होते. साम्राज्य हॉटेलच्या थोडे पुढे गेल्यानंतर कार आणि दुचाकीने विलास यांचा रस्ता अडवला. रस्ता विचारण्याच्या बहाण्याने या वाहनांमधून खाली उतरलेल्या सहा अनोळखी व्यक्तींनी विलास यांच्याशी हुज्जत घालत त्यांना मारहाण सुरू केली. बळजबरीने कारमध्ये कोंबले. यावेळी विलास यांनी आरडाओरड केली असता, त्यातील एकाने त्यांच्या उजव्या हाताच्या दंडावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले.

Sambhajinagar Crime |
Chatrapati Sambhajinagar : टीव्हीसेंटर चौकातील ऑक्सिजन हबवर कु-हाड

झाल्टा फाट्यावरून नेले जालना जिल्ह्यात

आरोपींनी विलास यांचे अपहरण करून झाल्टा फाटा येथे आणले. तेथे आधीच अचिन आणि सचिन चव्हाण होते. तुझ्या भावाने आमचे पैसे दिले नाहीत, असे म्हणत त्यांनीही विलास यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर या आठही जणांनी मिळून विलास यांना पुन्हा गाडीत बसवले आणि अंबड तालुक्यातील भासुनाईक तांडा येथे नेऊन एका खोलीत डांबून ठेवले. जोपर्यंत तुझा भाऊ आमचे पूर्ण पैसे देत नाही, तोपर्यंत तुला सोडणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली.

सकाळी पैसे घेतल्यानंतरच केली सुटका

दुसऱ्या दिवशी, सोमवारी (दि.१६) सकाळी ७ वाजेच्या सुमारास आरोपींन आरोपींनी विलास यांना त्यांचा भाऊ विकास याला फोन करण्यास लावला. विलास यांनी घडलेला प्रकार भावाला सांगितला. भावाचा जीव वाचवण्यासाठी विकासने तात्काळ आरोपी सचिन चव्हाणला फोन पे द्वारे ४० हजार रुपये पाठवले.

पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी उर्वरित पैशासाठी विलास यांच्याकडून पाचशेच्या बॉण्डवर लिहून घेतले. उर्वरित पैसे दिलेल्या तारखेला दिले नाहीत, तर तुला आणि तुझ्या भावाला खतम करून टाकू, अशी जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी विलास यांना सोडून दिले. सुटका झाल्यानंतर विलास चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगर गातून थेट घाटी रुग्णालयात उपचार घेतले व त्यानंतर सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्ह्याचा अधिक तपास

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news