

पाचोड : शेतामधील पाणी बाहेर काढण्याच्या वादामधून तक्रार केली. त्या तक्रारीचा पंचनामा करण्यासाठी मंडल अधिकारी व तलाठी आले असता त्यांनी तक्रारदारालाच सुनावले. हा राग मनात धरून खादगाव (ता. पैठण) येथील एका 45 वर्षे शेतकर्याने थेट पंचनामा सुरू असताना अधिकार्यांसमोरच स्वतःच्या विहिरीमध्ये उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली.
संजय शेषराव कोहकडे (रा. खादगाव, ता. पैठण) असे आत्महत्या करणार्या शेतकर्याचे नाव आहे. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. कोहकडे यांची खादगाव-खेर्डा रस्त्यालगत शेती आहे. खेर्डा-खादगाव रस्त्यालगत दोन्ही दिशेने नालीचे खोदकाम करण्यात आले आहे; मात्र संजय कोहकडे यांना जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी त्या नालीमधून रस्ता तयार केला होता. परिणामी, त्यांच्या शेतामध्ये पाणी साचू लागले. यामुळे दुरून येणारे पाणी दुसर्या दिशेने बंद करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती.