Farmer Death Sambhajinagar | कन्नड तालुक्यात शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले

हतनूर येथील घटनेने हळहळ
Farmer Hanging News Kannad
संतोष पंडितPudhari
Published on
Updated on

Farmer Hanging News Kannad

हतनूर : कन्नड तालुक्यातील हतनूर येथील संतोष दशरथ पंडित (वय ४४) या शेतकऱ्याने शेजाऱ्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला नॉयलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना बुधवारी (दि. ११) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली.

मृत संतोष पंडीत हतनूर शिवारातील गट क्रमांक १८४ मधील शेतवस्तीवर वास्तव्यास होते. आज दुपारी तीनच्या सुमारास शेजारील शेतकरी  गोरख वीर यांच्या शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास  घेऊन जीवन संपविले.

Farmer Hanging News Kannad
Chatrapati Sambhajinagar Crime : संभाजीनगरात घर फोडून 25 तोळे सोने लंपास

हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रदीप कांबळे यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. मृताच्या पश्चात आई- वडील, पत्नी, तीन मुले, एक मुलगी, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे.

या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक  डॉ. रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कैलास करवंदे, मनोज घटुरसिंग  करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news