Ajanta Caves damaged Road News
फर्दापूर - जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचे प्रवेशद्वार असलेल्या फर्दापूर-अजिंठा लेणी टी-पॉइंट बसस्थानक परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मोठमोठ्या खड्यांमुळे पर्यटकांना अक्षरशः खड्यांचे दणके सहन करीत अजिंठा लेणीपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. या प्रकाराबाबत देशी-विदेशी पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ मात्र याकडे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहे.
अजिंठा लेणीतील पुरातन चित्रशैली व शिल्पकलेचे प्रदू-षणापासून संरक्षण व्हावे यासाठी युनेस्कोच्या सूचनेनुसार सन २००२ पासून खासगी वाहनांना लेणीपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला. त्यामुळे पर्यटकांना फर्दापूर टी-पॉइंट येथून प्रदूषणविरहित बसने चार किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. यासाठी टी-पॉइंट परिसरात वाहनतळ, शॉपिंग प्लाझा, बसस्थानक व इतर मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या. परंतु या सुविधा उभारूनही त्याची नियमित देखभाल व दुरुस्तीची कामे होताना दिसत नाही. परिणामी, बसस्थानक परिसरातील इन-आऊट गेटलगतचा रस्ता अक्षरशः खड्यांनी भरलेला असून, त्याची चाळण झाली आहे.
या खड्यांवरून प्रवास करताना बस एका बाजूला झुकत असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. त्यामुळे भविष्यात या खड्यांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच या मोठमोठ्या देश-विदेशातून अजिंठा लेणी सफरीवर आलेल्या पर्यटकांना याच खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. (छायाः सागर भुजबळ), खड्यांमुळे अजिंठा लेणी मार्गावर घा-वणाऱ्या एसटी बसच्या एअर सस्पेंशन व बलूनमध्येही वारंवार बिघाड होऊन एसटी महामंडळालाही आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने अजिंठा लेणी सफरीवरयेणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशात पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्यांमध्ये साचून, खड्यांच्या लांबी-रुंदी व खोलपणाचा अंदाज येत नसल्याने वाहनचालक व पर्यटकांसाठी ही परिस्थिती अधिक संकटदायक बनली आहे. त्यामुळे
अजिंठा लेणीसारख्या ऐतिहासिक व जागतिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी येताना रस्त्याची ही अवस्था असेल तर जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना भारतातील पर्यटन व्यवस्थेचे काय दर्शन घडत असेल, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया संतप्त पर्यटकांकडून ऐकायला मिळत आहेत.
साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांवरील खड्डे अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दररोज लेणीच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या जीवाशी हा खेळ सुरू असून, प्रशासनाच्या व पर्यटन महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे जागतिक वारसा स्थळाकडे दुर्लक्ष होत आहे.