Sambhajinagar Crime News : घाटीत प्रसूती न होताच मिळवले बनावट जन्मप्रमाणपत्र

सेतू केंद्राजवळील एजंटचा प्रताप; रजिस्ट्रारची बोगस स्वाक्षरी वापरल्याचे उघड
Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime Newspudhari photo
Published on
Updated on

Fake birth certificate obtained without delivery in the Ghati hospital

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) पत्नीची प्रसूती झाली नसतानाही, एका अनोळखी एजंटमार्फत रजिस्ट्रारची बनावट स्वाक्षरी असलेले मुलीचे बोगस जन्मप्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी घाटी प्रशासनाच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात मिसारवाडी येथील सुनील छबू भालेराव (३६) याच्याविरुद्ध बुधवारी (दि. १५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sambhajinagar Crime News
Chatrapati Sambhajinagar : विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; शेजाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

घाटी रुग्णालयाच्या वैद्यकीय अभिलेख विभागाचे प्रमुख डॉ. गणेश लोखंडे (४५) यांच्या फिर्यादीनुसार, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नुकतेच घाटी प्रशासनाला एक पत्र पाठवले होते.

या पत्रात सुनील छबू भालेराव (३६, रा. मिसरवाडी) आणि त्याची पत्नी कडूबाई भालेराव यांच्या 'राणी' नावाच्या मुलीचे जन्मप्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय मनपाने व्यक्त केला होता. या पत्राची गंभीर दखल घेत घाटी प्रशासनाने रुग्णालयातील मूळ अभिलेखांची (रेकॉर्ड) कसून पडताळणी केली. या तपासणीत कडूबाई भालेराव या घाटीत प्रसूतीसाठी कधी दाखलच झाल्या नव्हत्या आणि त्यांच्या मुलीचा जन्मही घाटीत झाला नसल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट झाले.

Sambhajinagar Crime News
अल्पवयीन मातेच्या प्रसूतीदरम्यान बालविवाहाचा पर्दाफाश

आरोपी सुनील भालेराव याने जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राजवळ एका अनोळखी एजंटला गाठून हे बोगस प्रमाणपत्र तयार करून घेतल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रमाणपत्रावर जन्म-मृत्यू विभागाच्या रजिस्ट्रारची बनावट स्वाक्षरी करण्यात आली होती. हा सर्व गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर, घाटीच्या अधिष्ठात्यांनी दिलेल्या आदेशानुसार डॉ. लोखंडे यांनी बेगमपुरा पोलिसांत तक्रार दिली. या तपासामधून बनावट प्रमाणपत्रे तयार करणारी मोठी साखळी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news