Sambhajinagar Rain News :सोयगाव, जरंडी मंडळात अतिवृष्टी

निंबायती गावात पुराचे पाणी शिरले, सोयगावात दोन तासांत १२४ मि.मी. नोंद
Sambhajinagar Rain News
Sambhajinagar Rain News :सोयगाव, जरंडी मंडळात अतिवृष्टीfile photo
Published on
Updated on

Excessive rainfall in Soygaon and Jarandi circles

जरंडी, पुढारी वृत्तसेवा : सोयगाव तालुक्यातील सोयगाव आणि जरंडी मंडळात बुधवारी पहाटे पाच वाजेपासून मुसळधार पाऊस झाला या पावसाने, जरंडीत धिंगापूर धरणात पाण्याची तीस टक्के आवक वाढली असून सोयगाव शहराच्या सोना नदीला पहिला पूर आला आहे.

Sambhajinagar Rain News
Parbhani Cloudburst : परभणी जिल्ह्यात पुन्हा ढगफुटी, सखल भाग जलमय; शेकडो घरांत पाणी, शिल्लक पिकेही पाण्यात

बुधवारी पहाटे पाच वाजेपासून सोयगाव आणि जरंडी मंडळात मुसळधार तर इतर ठिकाणी तुरळक पावसाची नोंद झाली आहे या पावसाने निंबायती गावातील नाल्याला आलेल्या पुराचे पाणी निंबायती गावात शिरले होते. त्यामुळे नाल्याच्या काठावर असलेल्या ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते.

Sambhajinagar Rain News
Jalna Water Crisis : जालनेकरांना पावसाची प्रतीक्षा, पाणीप्रश्न गंभीर

दुपारी एक वाजेनंतर पूर ओसरण्यास सुरुवात जाली. थिंगापूर धरणात तीस टक्के पाण्याची आवक आल्याने धिंगापूर धरणात आता चाळीस टक्के पाणी साठा झाला आहे सोयगावच्या वेताळवाडी धरणातही पाण्याची आवक वाढली. सोयगाव मंडळात पहिल्यांदाच दोन तासांत १२४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून जरंडी मंडळात ७० मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वात कमी सावळदबारा मंडळात ६ मिमी पाऊस झाला. बनोटी मंडळात २७ मिमी पाऊस झाला आहे तालुक्यात सरासरी ५६ मिमी पाऊस झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news