Delhi Gate : दिल्लीगेटच्या जागेचे १९५५ पासूनचे रेकॉर्ड तपासणे सुरू

मनपाकडूनही मागविली माहिती, पेट्रोल पंपला जागा विकल्याचेही पुरावे
Delhi Gate
Delhi Gate : दिल्लीगेटच्या जागेचे १९५५ पासूनचे रेकॉर्ड तपासणे सुरूfile photo
Published on: 
Updated on: 

Examination of records for the Delhi Gate site dating back to 1955 is underway

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: दिल्ली गेट येथील गट क्रमांक ३४ सह आजूबाजूची जागा सरकारी वर्ग २ ची असून या जागेचे १९५५ ते १९७१-७२ सालापर्यंतची अभिलेखे तपासण्यास जिल्हा प्रशासनाने सुरूवात केली आहे.

Delhi Gate
Unauthorized layout : चिकलठाण्यात ८५८ अनधिकृत भूखंडांवर मनपाचा हातोडा

मंगळवारी (दि. ६) झालेल्या बैठकीत या जागेच्या मालकी हक्काबाबतचे बहुतांश रेकॉर्ड अधिकाऱ्यांनी तपासले आहेत. यात पेट्रोल पंपला जागा विक्री केल्याची माहिती प्रशासनाच्या हाती लागली आहेत. त्यासोबतच आता महापालिकेकडूनही संचिका मागविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

विभागीय आयुक्तालयालगत असलेल्या भारत पेट्रोल पंपासमोरील गट क्रमांक ३४ मधील खुल्या भूखंडाच्या मालकी हक्कावरून सध्या वादंग सुरू आहे. त्यावरून विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही जागा खिदमतमास इनाम भोगवटा वर्ग-२ ची आहे की खासगी मालकीची यासंदर्भात तातडीने रेकॉर्ड तपासण्यात यावेत, असेही आदेश यापूर्वीच विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

Delhi Gate
Harsul Lake : हर्सूल तलाव पुन्हा कोरडा पडण्याच्या मार्गावर

त्यानुसार मंगळवारी अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली. त्यात सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या माहितीवर अप्पर तहसिलदार उमेश पाटील, नगरभूमापनच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

दरम्यान, गट क्रमांक ३४ सह लगतच्या सरकारी वर्ग २ भोगवटात मोडणाऱ्या जागेचीही माहिती तपासण्यात आली सुमारे १९५५ सालापासून तर १९७१-७२ पर्यंतची माहिती तपासण्यात आल्याचेही सुत्रांनी सांगितले. जमिनीचे मूळ अभिलेख तपासने सुरू झाले आहेत. यात जुने महसुली अभिलेख, खासरा पत्रक आणि जुना तास बारा उताऱ्यात जमीन खिदमतमास इनाम भोगवटा वर्ग-२ कागदपत्रांची तपासणी झाली. त्यात प्रथमदर्शनी गट क्रमांक ३४ खिदमतमास दिसत असल्याचे सुत्रांनी सांगितले. आता महापालिकेकडूनही काही कागदपत्रे मागविण्यात आले आहे.

जागेचा सीटीएस नंबर तपासला

१९७१ ते ८२ या कालावधीत शहरातील बहुतांश गट क्रमांक बंद होऊन त्यावर सीटीएस क्रमांक पडले आहेत. त्यामुळे नगरभूमापन आणि महापलिकेकडूनही या जागेबाबतची माहिती मागविण्यात आली आहे. दरम्यान, पेट्रोल पंपची जागा याच कालावधीत विक्री झाल्याचे देखील रेकॉर्डमध्ये अढळल्याचे सुत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news