

पैठण : चंद्रकांत अंबिलवादे
जायकवाडी पक्षी अभयारण्यात रविवारी दि.१९ रोजी आशियायी पाणपक्षी गणना वन्यजीव विभाग, BNHS (Bombay natural history society) पक्षी अभ्यासक, पक्षी मित्र, आदींची दहा पथके तयार करुन पैठण, शेवगाव, नेवासा तालुक्यातील २८ ठिकाणी पहाटेच्या वेळेत पक्षी निरिक्षण करण्यात आले. सदरील निरिक्षण मोहीमेमध्ये जायकवाडी पक्षी अभयारण्यातील पाणथळाच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे पक्षांची संख्या घटल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
जायकवाडी पक्षी अभयारण्याची सन ८५ रोजी घोषणा झाली. पस्तीस हजार हेक्टरवर असलेल्या या अभयारण्यात रविवारी रोजी २८ ठिकाणी एकाच वेळी पहाटेपासून पक्षी गणना झाली. यात दोनशेहून अधिक प्रजाती आढळुन आल्या. परंतु मागील काही वर्षाच्या तुलनेत देश, विदेशातील पक्षी संख्या घटली असल्याचे समोर आले असुन. पक्षांच्या प्रजाती तेवढ्याच येत असल्याचे या निरिक्षणातुन समोर आले आहे. जायकवाडीच्या पक्षी अभयारण्यातील प्रमुख आकर्षण ठरणारा फ्लेमिंगो हा पक्षी शेकडो च्या थव्याने टाकळी, रामडोव्ह, मावसगव्हान या परिसरात आढळला. फ्लोमिंगो काही वर्षापूर्वी जायकवाडीवर लाखोंच्या संख्येने असत यंदा मात्र या पक्षी गणनेमध्ये शेकडोंच्या संख्येने आढळून आले असल्याचे पक्षी मित्र प्रा.संतोष गव्हाणे, सुनील पायघण यांनी सांगितले.
जायकवाडीची जैविक विविधता कायम असुन सध्या स्थलांतरित पक्षांची संख्या कमी झाली आहे. यात धरण परिसरातील पाणथळाचे अतिक्रमणासह इतर बाबींचा समावेश असल्यामुळे जायकवाडी पक्षी अभयारण्यातील पक्षांची संख्या घटली असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पक्षी गणना मोहीमेसाठी विभागीय वन अधिकारी राहुल सपकाळ यांनी दहा पथके तयार केली होती. यात मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएचएनएस) व पैठण व छत्रपती संभाजीनगर येथील पक्षीमित्र, पक्षी अभ्यासकांसह पोलीस निरीक्षक संजय देशमुख हे देखील सहभागी झाले होते. त्यातून ही बाब समोर आली आहे.
सोनेवाडी, जायकवाडी अभयारण्य भिंत, पन्नालाल नगर, यासह टाकळी, लांबगव्हाण, दहेगाव, विजापूर, वरखेड, कायगाव टोका, मावसगव्हण,रामडोव्ह , बोट हाऊस, जायकवाडी दक्षिण पंप हाऊस आदी ठिकाणांचा समावेश होता.
यात प्रामुख्याने स्थानिक व स्थलांतरित पक्षी आढळले आहेत. यात फ्लेमिंगो कॉमन कूट (वारकरी) स्पॉट बिल (हळदी कुंकू), पोचार्ड, कार्मोरंट, सिगल, व्हिस्पर टर्न, रिव्हर टर्न, रेड कॅपेड आयबीस, ग्लॉसी आयबीस, ब्लॅक हेडेड आयबीस, ब्राम्ही डक, किंग फिशर, रॉबिन, ब्लॅक विंग स्टील्ट, येलो वेगटेल, वारकरी बदक, जांभळी पाणकोंबडी, लाजरी पाणकोंबडी, उघड्या चोचीचा करकोचा, रंगीत करकोचा, शराटी, कुदल्या, भौर्डी मैना, भुवई बदक, थापत्या बदक, तरंग, चक्रंग बदक, धनवर बदक, रोहित, कुकरी गरुड, दलदल ससाणा, खाटीक, गप्पिदास, धोबी, चर चरी, पानडुबी, कुरव, सुरय, कमळ पक्षी, खंड्यासह दोनशेहून अधिक प्रजातीचे पक्षी पाणथळाच्या जागेवर व जायकवाडीच्या पाणपसऱ्यावर हे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळले असल्याचे पक्षी मित्र संतोष गव्हाणे यांनी सांगितले.
या पक्षी गणनेसाठी विभागीय वन अधिकारी राहुल सपकाळ, वनपाल, अनिता जाधव, रूपाली सोळसे, शेख, संदीप कराळे, राहुल तरवडे, सोमिनाथ बुधवंत यांच्यासह पैठण येथील पोलिस निरीक्षक संजय देशमुख, प्रा.संतोष गव्हाणे, दिलीप भगत, सुनील पायघन, बजरंग काळे, सुनील डिंगरे, अर्जुन कुचे यांच्यासह मानद वनपाल डॉ. किशोर पाठक बीएचएनएसचे मोहीजीत पोदार, अभिनव नायर, कुणाल विभांडिक, किरण परदेशी, राहुल मराठे, प्रमिला मोरे, श्रवण परळीकर आदिंनी सहभाग नोंदवला.
दोन वर्षापूर्वी टॅग (रींग )लावलेला ब्लॅक विंग स्टिल्ट हा पक्षी व रफ, ब्लॅक टेल गॉडविट, ग्रेटर थीकणी हे रशिया युरेशिया, मंगोलिया येथील स्थलांतरीत पक्षी देखील आढळून आले असे प्रा.संतोष गव्हाणे, वनाधिकारी राहुल सपकाळ यांच्या टिमला आढळून आले.
यावेळी पक्षी गणना होणार म्हणून आवर्जून पक्षी निरिक्षण करण्यासाठी पैठणचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी देखील पहाटे पासून पक्षी निरिक्षण केले. यावेळी देश विदेशातील पक्षी बघण्याचा आनंद घेतला यावेळी विद्यार्थी देखील पक्षी निरीक्षणात सहभागी झाले होते.