Mohatadevi Temple : मोहटादेवी मंदिरासमोरील अतिक्रमण हटविले

बजाजनगर येथील मोहटादेवी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पूजेचे साहित्य आणि फळविक्रीची दुकाने थाटून करण्यात आलेले अतिक्रमण सोमवारी (दि. १२) हटविण्यात आले.
Mohatadevi Temple
मोहटादेवी मंदिरासमोरील अतिक्रमण हटविलेfile photo
Published on: 
Updated on: 

Encroachments in front of Mohatadevi Temple removed

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : बजाजनगर येथील मोहटादेवी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पूजेचे साहित्य आणि फळविक्रीची दुकाने थाटून करण्यात आलेले अतिक्रमण सोमवारी (दि. १२) हटविण्यात आले. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मोहटादेवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या घटना घडण्याची तसेच चेंगराचेंगरीची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.

Mohatadevi Temple
Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन द्या - शिक्षक समिती

पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलिस आयुक्त मजहरअली सय्यद आणि पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे हे पोलिस व एमआयडीसीच्या पथक कर्मचाऱ्यांसह मंदिर परिसरात दाखल झाले. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच मुख्य रस्त्यावर असलेल्या हातगाड्या व दुकाने हटविण्याच्या सूचना त्यांनी व्यावसायिकांना दिल्या. पूजेचे साहित्य विक्रेत्यांनी मंदिराच्या मागील बाजूस दुकाने लावावीत, असेही सांगण्यात आले.

Mohatadevi Temple
Marathwada Drought : इतिहासाच्या पानांतून : सव्‍वाशे वर्षापूर्वीचा एका छायाचित्रातील दुष्काळ

त्यानुसार व्यावसायिकांनी स्वतःहून दुकाने हटविली. दरम्यान, एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी मंदिर ट्रस्टचे प्रवेशद्वाराजवळील दोन व्यावसायिक गाळे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. यावेळी बघ्यांनी परिसरात मोठ गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news