Ellora Caves : जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये अद्भुत 'किरणोत्सव'

सूर्य किरणे थेट बुद्धमूर्तीच्या चेहऱ्यावर; देश-विदेशी पर्यटकांनी अनुभवला अनोखा नजारा
Ellora Caves
वेरूळ लेणी क्रमांक १० मधील बुद्धमूर्तीवर मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे पडल्याचा मनोहारी क्षण. (छायाः किरन महेर)
Published on: 
Updated on: 

वेरूळ : जगप्रसिद्ध वेरूळ लेणी समूहातील लेणी क्रमांक १० अर्थात प्रसिद्ध विश्वकर्मा लेणी (सुतार झोपडी) येथे शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी अद्भुत 'किरणोत्सव' अनुभवायला मिळाला. दुपारनंतर मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे विशेष झरोक्यातून थेट लेणीच्या गर्भगृहात प्रवेश करून धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत विराजमान भगवान बुद्धांच्या मूर्तीवर पडली.

सूर्यकिरणांनी बुद्धमूर्तीचा चेहरा प्रकाशमान होताच संपूर्ण लेणी परिसरात एक वेगळेच तेज पसरले. हा मनोहारी क्षण पाहण्यासाठी उपस्थित असंख्य देशी-विदेशी पर्यटकांनी हा अनोखा नजारा डोळ्यांत साठवला.

Ellora Caves
Sambhajinagar Crime : चोरट्यांचा उंडणगावात धुमाकूळ; लाखोंची चोरी

किरणोत्सव पाहण्यासाठी दुपारपासूनच लेणी क्रमांक १० मध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सूर्यकिरणे हळूहळू लेणीच्या आतील भागात प्रवेश करू लागली. काही क्षणांतच ती बुद्धमूर्तीच्या चेहऱ्यावर स्थिरावली आणि उपस्थित पर्यटकांनी टाळ्यांचा कडकडाट व आनंदाच्या जयघोषाने या अद्भुत क्षणाचे स्वागत केले.

अनेक पर्यटकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यांतून या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ टिपले. ऑक्टोबर महिन्यात सूर्याच्या विशिष्ट स्थितीनुसार मावळत्या सूर्याची किरणे लेणीसमोरील नक्षीदार झरोक्यातून विशिष्ट कोनातून आत प्रवेश करतात.

Ellora Caves
MSRTC Online Pass : एसटीचा आवडेल तेथे कोठेही पास आता ऑनलाईन

ही किरणे थेट गर्भगृहातील भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर पडत असल्याने काही काळ मूर्ती प्रकाशमान झाल्याचे दिसते. स्थापत्यकला आणि खगोलीय स्थितीचा सुंदर संगम या घटनेतून अनुभवायला मिळतो. दरवर्षी या अद्भुत किरणोत्सवाचा अनुभव घेण्यासाठी अभ्यासक, छायाचित्रकार तसेच देश-विदेशातील पर्यटक वेरूळला आवर्जून भेट देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news