Renu leopard : वयोवृद्ध बिबटीण रेणूचा सिद्धार्थ उद्यानात मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून ती आजारी होती. तिच्यावर उपचार सुरू होते.
Renu leopard
Renu leopard : वयोवृद्ध बिबटीण रेणूचा सिद्धार्थ उद्यानात मृत्यूFile Photo
Published on
Updated on

Elderly leopard Renu dies in Siddhartha Udyan

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील वयोवृद्ध बिबटीण रेणू (१६) हिचा रविवारी (दि.९) पहाटे मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून ती आजारी होती. तिच्यावर उपचार सुरू होते. प्राणिसंग्रहालयातील पशुवैद्यक। डॉ. नीती सिंग यांच्या देखरेखीखाली रेणूवर उपचार सुरू होते. मात्र वयोमानानुसार तिची प्रकृती खालावत चालल्याने तिने उपचारांना प्रतिसाद दिला नाही.

Renu leopard
Sambhajinagar Crime : हॅलो, मशिदो में कुछ लोग बॉम्बस्फोट करणे वाले हैं

रेणूला २०१५-१६ मध्ये आमटेज रेस्क्यू सेंटर, हेमलकसा येथून सिद्धार्थ उद्यानात आणण्यात आले होते. मागील दहा वर्षांपासून ती प्राणिसंग्रहालयातील आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. रेणूच्या मृत्यूनंतर तिचे शवविच्छेदन शासकीय पशुचिकित्सालयातील डॉ. जयकुमार सातव व डॉ. संदीप राठोड यांनी केले. पंचनामा करण्यासाठी वनविभागाचे वनपाल अविनाश राठोड व वनरक्षक डी. एस. पवार हे उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर रेणूवर प्राणिसंग्रहालय परिसरातच अंत्यसंस्कार करून पंचनामा करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news