Ashadhi Ekadashi : एकनाथ महाराज पालखी सोहळा धाराशिव जिल्ह्यात दाखल

आज नांगरडोह येथे तिसरे रिंगण, भाविकांकडून जय्यत तयारी; समाज आरती उत्साहात
Ashadhi Ekadashi
Ashadhi Ekadashi : एकनाथ महाराज पालखी सोहळा धाराशिव जिल्ह्यात दाखल file photo
Published on
Updated on

Eknath Maharaj Palkhi procession enters Dharashiv district

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पंढरीच्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी निघालेला श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळा धाराशिव जिल्ह्यातील दांडेगाव (ता. भूम) येथे दाखल झाला असून. यावेळी भाविकांनी सोहळ्याचे जोरदार स्वागत करून नाथांच्या पादुकांची समाज आरती मोठ्या उत्साहात केली. गावातील प्रत्येक भाविकांनी आपापल्यापरीने भाजी भाकरी एकत्र करून वारकऱ्यांची भोजन व्यवस्था केली होती.

Ashadhi Ekadashi
Paithan Wari |आज श्रीसंत एकनाथ महाराज, श्रीसंत भगवान बाबा यांची संत भेट

सोहळ्याचे तिसरे रिंगण नांगरडोह या पंचक्रोशीत शुक्रवारी (दि.१७) होणार असल्याने परिसरातील भाविकांनी रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी केली. श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम गुरुवारी ऐतिहासिक खर्डा किल्ल्याच्या पायथ्याशी झाला होता.

सकाळी सोहळा दहाव्या मुक्कामासाठी अंतरवाली, तिंत्रज मार्गे दांडेगाव येथे सायंकाळी दाखल झाला. यावेळी दांडेगाव येथील सरपंच पांडुरंग भोगील, पंचायत समिती माजी सभापती अण्णासाहेब भोगील, उपसरपंच संजय भोगील, पोलिस पाटील विकास भोगील यांच्यासह भाविकांनी पालखी सोहळ्यातील आलेल्या वारकऱ्यांचे स्वागत करून नाथांच्या पादुकांचे पूजन केले.

Ashadhi Ekadashi
Jalna News : संत मुक्ताबाई रिंगण सोहळ्याने पारणे फिटले

मारुती मंदिरासमोर नाथाच्या पादुकांची समाज आरती मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी परिसरातील महिला भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होती. सोहळ्यात आलेल्या हजारो वारकऱ्यांनी व महाराज मंडळींनी टाळ मृदंगाच्या तालावर भजन सुरू करताच भाविकांनी भानुदास एकनाथ जयघोष केला. आज शुक्रवारी नाथांच्या सोहळ्याचे तिसरे रिंगण नांगरडोह येथे आयोजित करण्यात आले आहे. पालखी रथाच्या मागे व पुढे चालणाऱ्या पायी दिंडी सोहळ्यातील महाराज मंडळी व वारकरी प्रथेप्रमाणे रिंगण साजरा करणार आहे. अकरावा मुक्काम अनाळे या ठिकाणी होणार आहे.

अरुंद रस्त्यामुळे वारकऱ्यांचे हाल

श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळा छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड जिल्ह्यातील पालखी मार्गावरून धाराशिव जिल्ह्यात दाखल झाला. खर्डा, तिंत्रज, दांडेगाव मार्गावरील पालखी रस्त्याची काम गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळले आहे. तित्रंज ते दांडेगावपर्यंत रस्ता अरुंद करण्यात आल्यामुळे वारकऱ्यांना पायी चालणे देखील अवघड झाले आहे. नागरिकांनी पालखी रस्त्याच्या अंदाजपत्राकानुसार रस्त्याचे काम होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली. पालखी सोहळाप्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांनी अंदाजपत्रकानुसार पालखी मार्ग तयार करावा अशी मागणी केलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news