Chatrapati Sambhajinagar firing : होमगार्डने मद्यधुंद अवस्थेत केला भरवस्तीत अंदाधुंद गोळीबार

पोलिसांनी केले बंदुकीसह १३ जिवंत काडतुसे जप्त
Home Guard open fire case
होमगार्डने मद्यधुंद अवस्थेत केला भरवस्तीत अंदाधुंद गोळीबारFile Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : एका होमगार्डने मद्यधुंद अवस्थेत भरवस्तीत अंदाधुंद गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास भावसिंगपुऱ्यातील निसर्ग कॉलनीत घडली.

याप्रकरणी छावणी पोलिसांनी संबंधित होमगार्डला अटक करून त्याच्याकडून १२ बोअरची बंदूक आणि १३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. आरोपीला शनिवारी (दि. २८) न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Home Guard open fire case
12th Board Exam : विद्यार्थिनीचा मोबाईल नंबर मागणाऱ्या पर्यवेक्षकास नातेवाईकांनी बदडले

प्रसन्नजीत कांबळे (वय ४८, रा. निसर्ग कॉलनी, भावसिंगपुरा) असे अटक केलेल्या होमगार्डचे नाव आहे. शुक्रवारी रात्री त्याने निसर्ग कॉलनी परिसरात मद्यधुंद अवस्थेत हवेत अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात मोठी घबराट पसरली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कांबळेला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, झडतीदरम्यान पोलिसांनी त्याच्या घरातून १२ बोअरची बंदूक व १३ जिवंत काडतुसे असा एकूण १३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यापूर्वीही केला होता गोळीबार

पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने शुक्रवारी रात्री दोन राऊंड फायर केले, मात्र त्यापूर्वीही त्याने १७ राऊंड फायर केल्याचे समोर आले आहे. त्याने हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून केला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Home Guard open fire case
Chatrapati Sambhajinagar Crime: पत्नीशी व्हिडिओ कॉलवर बोलत तरुणाने घेतली फाशी

शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, यापूर्वी केलेल्या १७ राऊंडच्या गोळीबाराबाबत त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे सखोल तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकील सुदेश दळवी यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news