Drug Racket : धुळ्याच्या शाळेवरील शिपायासह वाळूजच्या पेडलरला बेड्या

आमखास मैदानावर गुन्हे शाखेची कारवाई; १०० गोळ्या जप्त
Drug Racket
Drug Racket : धुळ्याच्या शाळेवरील शिपायासह वाळूजच्या पेडलरला बेड्या File Photo
Published on
Updated on

Drug racket: Dhule school guard, Waluj peddler arrested

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नशेच्या गोळ्या, सिरप विक्रीसाठी आलेल्या शाळेच्या शिपायासह त्याच्या नशेखोर साथीदाराला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. निट्रोसॅन १० नावाच्या शंभर गोळ्या जप्त केल्या असून, ही कारवाई गुरुवारी (दि.९) मध्यरात्री साडेदहा ते साडेबारा वाजेदरम्यान आमखास मैदानावर करण्यात आली.

Drug Racket
Sambhajinagar News : महापालिका शाळांना आता खेळांची नावे

कल्पेश चंदुलाल अग्रवाल (रा. धुळे) आणि सय्यद नबी सय्यद लाल (रा. जोगेश्वरी, एमआयडीसी वाळूज) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोघांना १५ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी शुक्रवारी (दि.१७) दिली. तर ज्ञानेश्वर मनोहर यादव ऊर्फ माऊली याला सिरपचे चार बॉक्स तर सय्यदलाही चार बॉक्स दिल्याचे तपासात समोर आले आहे.

अधिक माहितीनुसार, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी नार्कोटिक्स विरोधात कडक भूमिका घेतल्याने नशेखोरांचे धाबे दणाणले आहेत. वाळूजमध्ये स्वतः आयुक्तांनी लाखोंचे सिरप तस्करीचे ४३ पेडलर्सचे रॅकेट उघड केले होते. दरम्यान, गुन्हे शाखेचे निरीक्षक पोलिस निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक विनायक शेळके यांना कारमधून (एमएच-४८-एडब्ल्यू २०१२) आमखास मैदान येथे नशेच्या गोळ्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन पथकासह सापळा रचला. रात्री अकराच्या सुमारास कारमधून दोन जण आले. उतरून मागच्या सीटवर बसताच पोलिसांनी छापा मारून दोघांना ताब्यात घेतले.

Drug Racket
Eknath Shinde : थोडी शक्ती शिल्लक ठेवा, मुंबई हातची गेल्यावर पुन्हा हंबरडा फोडायचाय

कारच्या झडतीत निट्रोसॅन या नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या घातक गोळ्याच्या १० स्ट्रीप मिळून आल्या. चौकशीत कल्पेश अग्रवालने नशेच्या गोळ्या सय्यद नबीला देण्यासाठी आणल्याची कबुली दिली. तसेच त्याला सिरपचे चार बॉक्स तर ज्ञानेश्वर यादव (रा. जयभवानीनगर) याला दिल्याचे सांगितले. पोलिसांनी गोळ्या, तीन मोबाईल आणि कार असा ऐवज जप्त करून तिघांविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. अधिक तपास गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रविकांत गच्चे करत आहेत.

अग्रवाल धुळ्यातून चालवितो रॅकेट

बारावी पास असलेला अग्रवाल हा एका शाळेवर शिपाई म्हणून नोकरी करतो. त्याच्यासह सय्यद नबीविरुद्ध २०१८ साली एमआयडीसी वाळूज येथे एनडीपीएसचा गुन्हा नोंद आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्याने सेवा इंटरप्राइजेस नावाने काही सिरपचे बॉक्स मागविले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे रॅकेटची अनेक जिल्ह्यात पाळेमुळे असल्याचा अंदाज आहे.

शहरातील पेडलरला पुरवठा

अग्रवाल आणि सय्यद नबी दोघेही शहरातील पेडलरला नशेच्या गोळ्या, औषधी विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्या चौकशीत अनेकांची नावे समोर येणार असून, शहरातील पेडलर्स पुन्हा रडारवर आले आहेत. मोबाईलमधील माहिती खंगाळणे सुरू केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news