डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक प्रवर्गातील ७३ जागांची भरती

समर्थ पोर्टलवरुन २ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Recruitment of 73 Professors
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ७३ प्राध्यापकांची भरती File Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक प्रवर्गातील ७३ जागांची भरती प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे. दीड वर्षांपूर्वी या भरती प्रक्रियेला राजभवनकडून स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर ती भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. आता नव्याने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २ एप्रिल ते २ मे दरम्यान केंद्र शासनाच्या समर्थ पोर्टलवरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करता येणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक प्रवर्गातील २८९ जागा मंजूर असून, आजघडीला १३० शिक्षक कार्यरत आहेत. रिक्त १५९ जागांपैकी ७३ पदे भरण्यास राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने ७ ऑगस्ट २०१९ रोजी मान्यता दिली. सप्टेंबर २०२३ मध्ये या भरतीसाठी अर्जही मागविण्यात आले. यावेळी ५ हजार ८१५ अर्ज ऑनलाईन तर सुमारे ४ हजार ६०० हॉर्डकापी जमा झाल्या. तथापि सदर भरती प्रक्रिया जुलै २०२५ मध्ये झालेल्या व्यवस्थापन परिषदेत रद्द करण्यात आली आहे.

सदर पदे भरण्यास परवाणगीही देण्यात यावी. यासाठी कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेरीस मार्चमध्ये पदभरतीस मान्यता देण्यात आली. नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी ७३ पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. यामध्ये प्राध्यापक आठ, सहायोगी प्राध्यापक १२ पदे व सहय्यक प्राध्यापकांची ५३ पदे भरण्यात येणार आहेत. केंद्रशासनाने विद्यापीठ व वरिष्ठ महाविद्यालयांसाठी समर्थ पोर्टल तयार केले असून या माध्यमातून ही संपूर्ण भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लिंक देण्यात आली असून २ एप्रिल ते २ मे दरम्यान ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. तर ऑनलाईन अर्जाची प्रत व सर्व कागदपत्रासह हार्ड कॉपी आस्थापना विभागात ९ मे रोजी कार्यालयीन वेळेत दाखल करावेत, असे कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news