

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या नावे बनावट खाते तयार करून त्यावरून नामांकित व्यक्तींकडे पैशाची मागणी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी (दि.४) सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते सक्रिय असल्याची माहिती निदर्शनास आली. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेण्यात आली. सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्याकडे प्रशासनातर्फे बनावट खातेधारकाविरोधात कारवाई करण्यासंदर्भातील तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांच्या नावाने बनावट खाते सक्रिय असलेल्या बनावट खातेधारकाविर ोधात कारवाई करण्याचा तक्रारी अर्ज प्राप्त झाला आहे. संबंधित खातेधारकाची लिंक आणि संबंधित माहिती मेटा कंपनीला कळविण्यात आली असून, खातेधारकासंदर्भातील तपशील मागविण्यात आला आहे. तपशील प्राप्त झाल्यानंतर तसेच खा-तेधारकाच्या मोबाईल क्रमांकावरूनही त्याची माहिती काढली जाणार असून, त्यानंतर रीतसर गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सनदी अधिकारी टार्गेट
सनदी अधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियावर खाते उघडून पैशाची मागणी करण्यात येत असल्याचे प्रकार याआधीही समोर आले आहे. धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभदिवेगावकर यांच्या नावाने २५ पेक्षा अधिक बनावट खाती उघडून पैशाची मागणी करण्यात आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अस्तिककुमार पांडेय यांच्या नावानेही बनावट खाते समोर आले होते.