पैठण : पैठण येथील नाथसागर धरणाचे २७ पैकी १८ दरवाजे उघडण्यात आले असून गुरुवारी (दि. २६) सकाळी दहा वाजेच्या दरम्यान धरणात येणाऱ्या पाण्याची आवक झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला असून आपत्कालीन दरवाजेही उघडण्याची शक्यता आहे.
नाथसागर धरण क्षेत्रात गुरुवारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, धरण उपविभागीय अभियंता विजय काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ पैकी १८ दरवाज्यातून ४७ हजार १६० क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत वाढविला आहे.