Verul Police | तिकिटाचा धागा पकडून शोधली लाखोंची पर्स; दिल्लीच्या महिला भाविकाकडे केली स्वाधीन

वेरूळ पोलिसांची तत्पर कारवाई; पर्समधील रोख रक्कम आणि मौल्यवान दागिने सुरक्षितपणे संबंधित महिलेच्या स्वाधीन करण्यात आली
Verul Bus Lost Bag Recovery
पर्समधील रोख रक्कम आणि मौल्यवान दागिने सुरक्षितपणे महिलेच्या स्वाधीन करण्यात आली.Pudhari
Published on
Updated on

Verul Police Bus Lost Bag Recovery

वेरूळ : श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी वेरूळ येथे आलेल्या दिल्लीतील महिला भाविकाची बसमध्ये विसरलेली तब्बल १ लाख ६५ हजार रुपयांची पर्स वेरूळ पोलिसांनी केवळ तिकिटाच्या आधारे शोधून काढली. पोलिसांच्या तत्परतेमुळे पर्समधील रोख रक्कम आणि मौल्यवान दागिने सुरक्षितपणे संबंधित महिलेच्या स्वाधीन करण्यात आले.

पहाडगंज, दिल्ली येथील कोमल राणा सोमवारी (दि. २४ ) श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी वेरूळ येथे आल्या होत्या. दर्शनानंतर परतताना त्यांची पर्स बसमध्येच राहिली. पर्समध्ये १५ हजार रुपये रोख तसेच सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने होते. पर्स हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.

Verul Bus Lost Bag Recovery
Chhatrapati Sambhajinagar News : उद्या अण्णा भाऊ साठे चौक ते उद्धवराव पाटील चौक मार्ग राहणार बंद

बसचा क्रमांक किंवा चालकाची माहिती उपलब्ध नसतानाही पोलिसांनी पर्समध्ये असलेल्या तिकिटाच्या आधारे तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी तिकिटाचा धागा पकडून बसचा माग काढला. तपासादरम्यान बस कन्नडच्या दिशेने गेल्याचे समोर आले. त्यानंतर चालकाचा संपर्क साधून बस थांबविण्यात आली.

होमगार्डच्या सतर्कतेमुळे पर्स बसमध्येच सापडली. कन्नड पोलिसांच्या मदतीने पर्स आणि त्यातील मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. खात्री केल्यानंतर १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल कोमल राणा यांच्या स्वाधीन करण्यात आला. लाखोंचा ऐवज सुखरूप परत मिळाल्याने महिला भाविकांनी पोलिसांचे आभार मानले.

Verul Bus Lost Bag Recovery
Chhatrapati Sambhajinagar Hospitals : शहरातील रुग्णालयांची अग्निसुरक्षा वाऱ्यावर

गर्दीत हरवलेली १० बालके, वृद्धही नातेवाईकांकडे

श्रावणी सोमवारनिमित्त श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत कुटुंबीयांपासून विभक्त झालेली १० बालके आणि एक वयोवृद्ध व्यक्ती पोलिसांना आढळून आली.

पोलिसांनी तत्परतेने त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत सर्वांना सुखरूप त्यांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे भाविकांची मोठी गैरसोय टळली असून, त्यांच्या कार्यतत्परतेचे भाविकांकडून कौतुक करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news