

Delay in heavy rain subsidy, farmers angry!
देवगाव रंगारी, पुढारी वृत्तसेवा कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने देवगाव रंगारी व परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पिके पाण्याखाली गेली. बियाणे सडली, तर काही ठिकाणी पूर्ण शेत ओसाड पडले. शासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी दोन महिने उलटून गेले तरीही शेतकऱ्यांना अद्याप अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. परिणामी शेतकरीवर्गात तीव्र नाराजी पसरून संताप उसळला आहे.
अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मूग, मका, ऊस आणि कापूस यासारख्या मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महसूल विभागाकडून पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगितले गेले, पण प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. ङ्गङ्घ अनुदानाची फाईल प्रक्रियेत आहेफ्फएवढेच उत्तर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटू लागला आहे.
आता खरीप हंगाम जवळजवळ संपला असून, रब्बी हंगामाची तयारी सुरू आहे. मात्र बियाणे, खते, डिझेल आणि मजुरीसाठी पैशाची कमतरता भासत आहे. शेतकऱ्यांना अनुदान मिळाले असते तर पुढील पिकाची पेरणी सहज झाली असती, पण शासनाच्या विलंबामुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. स्थानिक महसूल व कृषी खात्याकडून माहिती घेण्यासाठी अनेक शेतकरी कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र सर्वत्र एकच उत्तर-फाईल पुढे गेली आहे. या टाळाटाळीच्या कारभारावर शेतकऱ्यांनी तीव्र नार-ाजी व्यक्त केली आहे. काहींनी याला ङ्गङ्गकागदी पंचनामाफ्फ असे संबोधून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान नुकसानीचे पंचनामे होऊन दोन महिने झाले तरी अद्यापही महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी परिसरात फिरकतचे नसल्याचे अनुदानासंदर्भात कोणाला विचारणा करावी अशी खंत परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभियनि लक्ष देऊन शेतकऱ्यांची समस्या दूर करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.