

Dead body of retired clerk found in well without head
पैठण : पुढारी वृत्तसेवा
पैठण तालुक्यातील चिंचाळा येथील एका विहिरीमध्ये मुंडके कापलेल्या पुरुषाचा मृतदेह शुक्रवारी दि.९ रोजी आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले आहे. सदरील व्यक्ती न्यायालयातील सेवानिवृत्त लिपिक नामदेव एकनाथ ब्रह्मराक्षस (वय ६५ वर्ष) रा. छत्रपती संभाजीनगर अशी आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील विहामांडवा परिसरातील चिंचाळा येथे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेले व न्यायालयातून सेवानिवृत्त झालेले लिपिक नामदेव एकनाथ ब्रह्मराक्षस (वय ६५ वर्ष) या व्यक्तीचा स्वतःच्या मालकीच्या शेतातील विहिरीमध्ये मुंडके कापलेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी दि.९ रोजी सकाळी आढळून आला. यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेचे गांभीर्य लक्षात येताच अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सिद्धेश्वर भोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि शरदचंद्र रोडगे यांनी घटनास्थळाची पाहणी करून नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. सदरील व्यक्तीचे मुंडके नसल्यामुळे परिसरात व विहिरीतून शोध मोहीम पोलीस पथकाने हाती घेतली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी असलेले व न्यायालयातून सेवानिवृत्त झालेली लिपिक नामदेव एकनाथ ब्रह्मराक्षस यांच्या मालकीची चिंचाळा ता.पैठण या शिवारातील गट नंबर १२१ या ठिकाणी शेती आहे. अधून मधून चिंचाळा या ठिकाणी जाऊन शेती करीत होते. शुक्रवारी यांच्या शेतीतील योजनेतून घेतलेल्या विहिरीमध्ये मृतदेह तरंगत असल्याची खबर परिसरातील नागरिकांनी पाचोड पोलिसांना दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेतात अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि शरदचंद्र रोडगे यांनी यांनी पोलीस पथकासह घटनास्थळ दाखल होऊन सदरील मृतदेह परिसरातील नागरिकाच्या मदतीने पाण्याबाहेर काढला. मुंडके नसलेल्या मृतदेहाबद्दल ओळख पटविण्यास अखेर पोलिसांना यश आले. विहिरीमध्ये व परिसरात मृतदेहाच्या मुंडक्याची शोध मोहीम हाती घेतली आहे. या व्यक्तीचे मुंडके कापून खून पूर्ववैमनस्यातून झाला का व इतर काही कारणाने झाला यासंदर्भात पोलीस शोध घेत आहेत.