Chhatrapati Sambhajinagar burglary : जिल्हा न्यायालयामागे भरदिवसा दोन फ्लॅट फोडले; ५ लाखांचा ऐवज लंपास

वेदांतनगर हद्दीत सलग घरफोडीच्या घटना
Chhatrapati Sambhajinagar burglary
जिल्हा न्यायालयामागे भरदिवसा दोन फ्लॅट फोडले; ५ लाखांचा ऐवज लंपासFile Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूस असलेल्या सुयोग अपार्टमेंटमध्ये भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅटचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, असा ५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी (दि. २५) दुपारी २ ते ५ वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे आदल्या दिवशीच अशाच प्रकारे वेदांतनगर ठाण्याच्या हद्दीतच चोरट्यांनी दिवसा फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला होता.

फिर्यादी लक्ष्मीकांत भास्करराव पाचपोर (६०) हे केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातून २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. ते पुण्यात शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी गेले असता चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कडी-कोंडे तोडून आत प्रवेश केला.

Chhatrapati Sambhajinagar burglary
Chatrapati Sambhajinagar Crime: पोलिसांत तक्रार केल्याने कुटुंबावर केला कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला

चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट वाकवून त्यातील ३ तोळ्यांचे कंठी मंगळसूत्र, ३ ग्रॅमची अंगठी, ५ ग्रॅमचा सोन्याचा शिक्का, २.५ ग्रॅमचा सोन्याचा शिक्का, ७५० मिलीग्रामचा शिक्का, ४ ग्रॅमचे कानातले, १० ग्रॅमची बांगडी आणि २ ग्रॅमची बाळी, २१ ग्रॅमचे चांदीचे देव, ५० ग्रॅमचा चांदीचा पेला आणि ३८ हजार रुपये रोख असा मौल्यवान ऐवज चोरून नेला.

त्यानंतर रात्री ८:३० वाजेच्या सुमारास याच इमारतीत राहणाऱ्या दीपाली देशपांडे यांनी पाचपोर यांना फोन करून चोरीची माहिती दिली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी केवळ पाचपोर यांच्याकडेच नव्हे, तर माहिती देणाऱ्या दीपाली देशपांडे यांच्या घरातही हातसाफ केला. देशपांडे यांच्या घरातून इमिटेशन ज्वेलरी, चांदीची साखळी आणि ४५ हजार रुपये रोख चोरीला गेले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar burglary
Ramdas Athawale : प्रभाग रचना रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

चोरीला गेलेल्या एकूण ऐवजाचे बाजारमूल्य साधारण ५ लाख रुपयांच्या घरात आहे. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक नामदेव सुपे करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news