

Crime News: Sharp sword and illicit liquor seized
मंठा, पुढारी वृत्तसेवा : अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत मंठा पोलिस ठाणे येथील अधिकारी यांनी धडक कारवाई केली. यावेळी जुगार अड्ड्यावर छापा टाकून अवैध दारूसह तलावर जप्त करण्यात आली. याप्रकरणी आठ जणांविरुध्द मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तळणी बसस्थानकाजवळ, देवठाणा रोडलगत मोकळ्या जागेत काही इसम पैशावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस पथकाने छापा टाकला. कारवाई दरम्यान ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एकूण ४९२० रोख रक्कम, दोन दुचाकी वाहने, व जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख १४ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस ठाणे मंठा येथे गुन्हा न. 350 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंठा येथे एका इसमाकडे विनापरवाना धारदार लोखंडी तलवार असल्याची माहिती मिळाल्याने कारवाई करण्यात आली. आरोपीकडून ८०० रुपये किमतीची लोखंडी धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच तळणी बसस्थानक परिसरात संशयित इसमाची तपासणी केली असता त्याच्याकडून देशी दारूच्या १४ बाटल्या विनापरवाना बाळगताना मिळून आल्या. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.