Coriander Market Price : भावच नाही ! शेतकऱ्यानं कोथिंबिरीवर फिरवला रोटर

केलेला 40 हजार खर्च निघणेही मुश्कील
चाकूर (छत्रपती संभाजीनगर )
कोथिंबीरचे भाव गडगडल्याने शेतकऱ्याने निराश होऊन चक्क ४ एकर कोथिंबिरीवर रोटर फिरवला.Pudhari News Network
Published on
Updated on

चाकूर (छत्रपती संभाजीनगर ) : संग्राम वाघमारे

काबाडकष्ट करून चार एकर शेतामध्ये कोथिंबिरीचे पीक घेतले. चार पैसे हाताशी येतील या आशेने जीवापाड जपलेल्या कोथिंबिरीला बाजारात योग्य भाव न मिळाल्याने एका शेतकऱ्याने निराश होऊन चक्क ४ एकर कोथिंबिरीवर रोटर फिरवल्याची दुर्दैवी घटना चाकूर येथे घडली आहे.

दयानंद धोंडगे हे चाकुरातील एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते दिवसरात्र शेतीत राबतात, त्या पिकास विविध खते, अत्याधुनिक औषधी आणि फवारणीचा वापर करून चाळीस दिवस त्याची निगा राखली. बाजारात चांगला भाव मिळेल या आशेने त्यांनी बाजारात कोथिंबीरच्या भावाची विचारपूस केली. कोथिंबीरचे भाव पडल्याचे लक्षात येताच शेतात केलेली मेहनत आणि त्यासाठी केलेला ४० हजार खर्च निघणार नाही, मजुरीचे पैसेही निघेनात, शेवटी नाईलाज म्हणून शेतकरी दयानंद धोंडगे यांनी आपल्या कोथिंबीरच्या उभ्या पिकावरच थेट रोटर फिरवला आहे. दिवसेंदिवस शेती करणे अवघड होत चालले असून महागाईचा बडगामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, बाजारभाव नाही. नुकसान भरपाई वेळेत व विमा संरक्षण नाही त्यामुळे शेतकऱ्याला वालीच उरला नाही.

चाकूर (छत्रपती संभाजीनगर )
Farmers Struggle : कोवळी पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

ऐन भरात कोथिंबीरचे भाव गडगडल्याने खर्च तर दूरच, काढणीची मजुरीदेखील निघत नसल्याने चक्क ट्रॅक्टरचा रोटर फिरवण्याची वेळ दयानंद धोंडगे या शेतकऱ्यावर आली आहे. शेतकऱ्याने जगायचं तरी कसं? असा प्रश्न सतावत आहे. तर कोथिंबीरला भाव नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.

चाकूर (छत्रपती संभाजीनगर )
Nashik News | भावच नाही ! शेतकर्‍याने कोबी पिकात फिरवला रोटावेटर

कोथिंबीरला भाव लागून सुमारे चार लाख रुपये उत्पन्न होईल असा अंदाज व्यक्त करून त्याने अपेक्षा ठेवली होती. शेतकरी दयानंद धोंडगे यांच्या कोथिंबीरला भाव न मिळाल्याने त्यांना नुकसानीपोटी आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news