Sambhajinagar Rain : दिवसभर संततधार, ५. ४ मिमी पावसाची नोंद

कमाल तापमान २६ अंशांवर; नागरिकांना गारव्याचा दिलासा
Sambhajinagar Rain
Sambhajinagar Rain : दिवसभर संततधार, ५. ४ मिमी पावसाची नोंदfile photo
Published on
Updated on

Continuous rain throughout the day; 5.4 mm of rainfall recorded

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर शहरात शनिवारी दिवसभर रिमझिम पावसाची संततधार सुरू होती. सकाळपासूनच आभाळ दाटून आल्याने शहरात दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. सायंकाळपर्यंत ५.४ मिमी पावसाची नोंद झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक काहीशी मंदावली होती.

Sambhajinagar Rain
Sambhajinagar Rain : तिसऱ्या दिवशी बरसल्या हलक्या सरी

दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे बाजारपेठा, चौक आणि मुख्य मार्गावर वाहनांची गती कमी झाली. कार्यालयीन वेळेत अनेक ठिकाणी वाहनचालकांना संथ गतीने प्रवास करावा लागला. अधूनमधून पडणाऱ्या सरींमुळे नागरिकांनी छत्र्या आणि रेनकोटचा आधार घेतला.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार शहराचे कमाल तापमान २६.० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअस इतके राहिले. वातावरणातील सापेक्ष आर्द्रता ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने हवेत कमालीचा ओलावा जाणवत होता. ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

Sambhajinagar Rain
Jalna Rain News : जालना जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

शहरासह परिसरात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता असून, अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

हवामानाची नोंद कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअस सापेक्ष आर्द्रता ९८ टक्के पावसाची नोंद ५.४ मिमी सायंकाळपर्यंत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news