Congress Protest : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे क्रांती चौकात आंदोलन

पेट्रोल-डिझेलसह गॅसच्या किमती तात्काळ कमी करण्याची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Congress Protest : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे क्रांती चौकात आंदोलन
Published on
Updated on

Congress Stages Protest Against Fuel Price Hike at Kranti Chowk

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेस पक्षाने बुधवारी (दि. २७) क्रांती चौकात जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला. महार ाष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आयोजित या आंदोलनात कार्यकर्त्यांनी घो षणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

Congress Protest : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे क्रांती चौकात आंदोलन
Chatarapati Sambhajinagar: महापालिकेची पहिलीच सभा गाजली; २२ खोके’च्या घोषणांनी सभागृह दणाणले

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि शहर जिल्हाध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी मोदी सरकार हाय हाय, होश में आओ मोदी सरकार अशा घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविर ोधात संताप व्यक्त केला.

वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडल्याचा आरोप काँग्रेस स्थानिक नेत्यांकडून करण्यात आला. तसेच हॉटेल, खानावळ आणि खाद्यपदार्थ व्यवसायांवरही महागाईचा परिणाम होत असून खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

Congress Protest : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे क्रांती चौकात आंदोलन
LPG Price Hike | गॅस दरवाढीविरोधात महाविकास आघाडी आक्रमक; शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल व गॅसच्या किमती तात्काळ कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी मंत्री अनिल पटेल, डॉ. पवन डोंगरे, दीपाली मिसाळ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news