Chhatrapati Sambhajinagar : कर वसुली शिबीर घ्या, मनपा आयुक्तांचे आदेश

मंगल कार्यालयासह आरोग्य केंद्र, शासकीय कार्यालय या ठिकाणी घेण्याचे निर्देश
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : कर वसुली शिबीर घ्या, मनपा आयुक्तांचे आदेश File Photo
Published on
Updated on

Conduct tax collection camps, orders from Municipal Commissioner

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेकडून शास्ती से आझादी, शास्ती से मुक्ती हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत शासकीय कार्यालय, मंगल कार्यालय, पेट्रोलपंप, आरोग्य केंद्र या ठिकाणी शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीनदिवसीय कर वसुली शिबीर भरविण्याचे आदेश रविवारी (दि.१३) मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले. स्मार्ट सिटी कार्यालयात त्यांनी मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेतला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त तथा कर निर्धारक व संकलक अधिकारी विकास नवाळे, सर्व झोनचे सहायक आयुक्त आदींची उपस्थिती होती.

Chhatrapati Sambhajinagar
Jayakwadi Dam : जायकवाडी धरण @ ७६ टक्के, साठा ८० टक्के झाल्यावर माजलगावला पाणी सोडणार

यावेळी जी. श्रीकांत म्हणाले, कर वसुलीसाठी शास्ती से आझादी व शास्ती से मुक्ती हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये मालमत्ता करावर लावण्यात आलेली शास्ती ९५ टक्के माफ केला जाणार आहे. याचा लाभ मालमत्ताधारकांना मिळवून देण्यासाठी शासकीय कार्यालय, मंगल कार्यालय, पेट्रोलपंप, आरोग्य केंद्र, रेशन दुकान, नागरी मदत केंद्र या ठिकाणी मालमत्ता कर वसुलीचे शिबीर लावण्यात यावेत.

तसेच अधिकृत स्लम भागात सर्व समावेशक मालमत्ताची (खाली दुकान वर मकान) शास्ती पूर्णपणे माफ करून कर वसूल करावा. या मालमत्तांना रहिवासी मालमत्ता म्हणून गृहीत धरण्यात यावी, असे आदेशही श्रीकांत यांनी दिले. तसेच महापालिकेचा कर, पाणीपट्टी थकलेली असेल तर मालमत्ताधारकांना कोणत्याही योजनांचा लाभ दिला जाणार नाही, मनपामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभापासून बेबाकी नसलेल्यांना वंचित राहावे लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Chhatrapati Sambhajinagar
Ashadhi Ekadashi : एसटीला विठुराया पावला : गतवर्षीपेक्षा जास्त उत्पन्न

रात्री १० वाजेपर्यंत कार्यालय सुरू ठेवा

मनपा कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कराची वसुली जोमाने करण्यासाठी झोन कार्यालय रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवावेत. तसेच शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू राहतील. कर्मचाऱ्यांनी रविवारची सुटी सोमवारी घेतली तरी चालेल. मात्र नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही, असेही मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी यावेळी आदेशित केले.

शासनाकडे पाठवणार प्रस्ताव

महापालिका हद्दीतील नागरिकांकडे मालमत्ता कर, पाणीपट्टीची मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. ही थकबाकी वसुलीसाठी कडक धोरण राबवूनही उपयोग होत नाही. त्याकरिता राज्य शासनामार्फत देण्यात येणारे रहिवासी प्रमाणपत्र हे मनपाचे बेबाकी प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय दिले जाऊ नये, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news