Marathwada Flood : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी सरसावले

एक दिवसाचे वेतन देण्याचा मध्यवर्ती महासंघाचा निर्णय
Marathwada Flood
Marathwada Flood : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी सरसावले File Photo
Published on
Updated on

Class IV employees came forward to help flood victims

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चतुर्थश्रेणी कर्मचारीही सरसावले आहेत. राज्यातील सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने घेतला आहे.

Marathwada Flood
Heavy Rains : अतिवृष्टीने दसऱ्यालाच निघालं शेतकऱ्यांचं दिवाळं

महासंघाचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि सरचिटणीस बाबाराम कदम यांनी तसा निर्णय जाहीर केला आहे. सध्या मराठवाड्यासह राज्यातील इतरही काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांची घरे, शेती, जनावरे व उपजिविकेची साधने वाहून गेल्यामुळे हजारो कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले आहेत.

या आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील नागरिकांना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने सर्व शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन आ-पत्तीग्रस्त बांधवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार आहेत, असे महासंघाचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण व सरचिटणीस बाबाराम कदम यांनी कळविले आहे.

Marathwada Flood
MLA Abdul Sattar : पंचनाम्यात एकही शेतकरी वंचित राहणार नाही

कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिले असून, त्याच्या प्रती शासनाचे मुख्य सचिव आणि अपर मुख्य सचिव (वित्त) यांना दिली असल्याची माहिती राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news