Chhatrapati Sambhajinagar|‘कागदावरील नोंद व जमिनीवरील काम जुळलेच पाहिजे’, जि. प. अध्यक्षांकडून प्रत्यक्ष कामांची पडताळणी सुरु

Chhatrapati Sambhajinagar ZP work verification- कागदावरचे रस्ते अध्यक्षांच्या कसोटीवर! दोन वर्षांनी देयके प्रक्रियेत; अविनाश गलांडे टिकाव-फावड्यासह थेट कामावर
Chhatrapati Sambhajinagar
वैजापूर तालुक्यात मातोश्री शेत-पाणंद रस्ता खोदून कामातील स्तराची प्रत्यक्ष पडताळणी करताना जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, पंचायत समितीचे अधिकारी व अभियंते.Pudhari photo
Published on: 
Updated on: 

वैजापूर : मोजमाप पुस्तकात काम पूर्ण झाल्याची नोंद असली तरी प्रत्यक्ष रस्त्यावर तेवढेच काम झाले आहे का? याची खात्री झाल्याशिवाय मातोश्री शेत-पाणंद रस्त्यांचे देयक अदा होणार नाही. वैजापूर तालुक्यातील २०२३-२४ मध्ये मंजूर झालेल्या १२ कामांची देयके दोन वर्षांनंतर प्रक्रियेत आली असतानाच जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी ‘कागदावरील नोंद आणि जमिनीवरील काम जुळलेच पाहिजे’ अशी भूमिका घेत प्रत्यक्ष तपासणी सुरू केली आहे.

या तपासणीसाठी गलांडे स्वतः टिकाव-फावडा घेऊन रस्त्यांवर पोहोचत आहेत. पंचायत समितीचे अभियंते आणि रोजगार हमी योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांच्या उपस्थितीत रस्ता खोदून खडीकरण, स्तर आणि मजबुतीकरणाची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून देयकाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामांसाठी आता मोजमाप पुस्तकातील नोंदीच निर्णायक ठरणार आहेत.

या तपासणीमागे जिल्हा परिषद अध्यक्षांनी प्रशासनाला दिलेले निर्देशही महत्त्वाचे आहेत. त्यांच्या पत्रात अंदाजपत्रकातील निकषांप्रमाणे काम न करणे, निकृष्ट साहित्य वापरणे तसेच योग्य मजबुतीकरण न करताच मोजमाप पुस्तकात नोंदी केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे संबंधित रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी व दर्जा पडताळणी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Vikhe Patil : उपलब्ध पाणीसाठा ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल असे नियोजन करणार

सुराळा, खंबाळा, नांदूर ढोक, बिलोणी, भोकरगाव, मनूर, निमगाव, बाभूळतेल आणि तलवाडा परिसरातील कामांचा यात समावेश आहे. प्रत्यक्ष पाहणीत मोजमाप पुस्तक आणि जमिनीवरील काम यात तफावत आढळते की सर्व कामे निकषांत उतरतात,यावर आता संबंधित देयकांचे भवितव्य ठरणार आहे.

शासनाचा पैसा खर्च होत असताना प्रत्येक रुपयाचे काम प्रत्यक्ष झाले पाहिजे. मोजमाप पुस्तकात जेवढे काम दाखविले आहे, तेवढे काम जागेवर आहे की नाही, याची अभियंत्यांसमवेत पडताळणी केली जात आहे. काम नियमानुसार आणि दर्जेदार असेल तर देयकाला अडचण नाही. मात्र प्रत्यक्ष खात्री झाल्याशिवाय देयक अदा होऊ नये, अशी भूमिका आहे.

-अविनाश गलांडे, अध्यक्ष, जिल्हा परिषद

Chhatrapati Sambhajinagar
Sillod News : नापिकी, कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याने जीवन संपवले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news