छ. संभाजीनगर : भरधाव पिकअपच्या धडकेत एक युवक ठार, एक गंभीर

मुखेड गावाजवळील घटना
Chhatrapati Sambhajinagar accident
भरधाव पिकअपच्या धडकेत एक युवक ठार झाले.
Published on
Updated on

वरठाण : भरधाव पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी आहे. ही घटना शनिवारी (दि.२८ ) दुपारी एकच्या सुमारास बनोटी नागद रस्त्यावरील मुखेड गावाजवळ घडली. जगदीश संजय सोनवणे (वय १९, रा.शिदोंळ वडगाव (ता.सोयगांव) असे मृत युवकाचे नाव आहे.

Chhatrapati Sambhajinagar accident
नांदेड : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार तीन गंभीर

शिंदोळ वडगाव येथील जगदीश सोनवणे हा जळगाव येथे आयटीआय काॅलेजला शिक्षण घेत असून शिक्षणाकरीता लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी तो गावाकडे आला होता. बनोटी येथून कागदपत्रे घेऊन जगदीश सोनवणे व त्याचा मित्र अतुल गोवर्धन मोरे हे दोघे दुचाकी ( क्र. एम. एच .२० डी.झेड.३९६३) या दुचाकीने बनोटीकडून शिदोंळ वडगावकडे जात होते. यादरम्यान नागदकडून बैलाने भरलेली पिकअप (क्र.एम.एच.४६ ई.३२९६) या गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत जगदिश सोनवणे आणि अतुल मोरे दोघे गंभीर जखमी झाले. मुखेड येथील ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेतून दोघा तरुणांना उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान जगदिश सोनवणे याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर अतुल मोरे याच्यावर उपचार चालू आहेत.

Chhatrapati Sambhajinagar accident
Raigad Accident | सावरोली-खारपाडा मार्गावर दुचाकी अपघातात 2 ठार, 2 जखमी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news