छ. संभाजीनगर : महिलेच्या खूनाप्रकरणी साडेतीन महिन्यानंतर गुन्हा दाखल

चितेगाव येथील घटना
Chhatrapati Sambhajinagar murder news
पैशाच्या व्यवहारातून महिलेचा खून
Published on
Updated on

पैठण : पैठण तालुक्यातील चितेगाव येथे पैशाच्या व्यवहारातून एका अपंग महिलेला मारहाण करून प्राणघातक शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या महिलेवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना साडेतीन महिन्यापूर्वी तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असताना बिडकीन पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि ४) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुरेखा जालिंदर आश्रुबा बारवकर (वय २८, रा. शिरपूर धुमाळ ता. शिरूर कासार जि. बीड) असे या महिलेचे नाव आहे.

Chhatrapati Sambhajinagar murder news
Like Aani Subscribe | व्लॅागर… खून… रहस्य?

याबाबत मिळालेली माहिती अशी, पैठण तालुक्यातील चितेगाव येथील नेहरूनगर परिसरात १९ जून रोजी संशयित आरोपी विश्वचंद्र सुखदेव गालफडे (रा.पालशींगन जि. बीड) याचा व सुरेखा यांच्याशी पैशाचा व्यवहार सुरू होता. पैसे देण्यासाठी सुरेखा यांना चितेगाव येथे त्याने बोलविले होते. यावेळी पैशाच्या कारणाने दोघांमध्ये वाद होऊन यावेळी संशयित आरोपी विश्वचंद्र सुखदेव गालफडे याने सुरेखा यांना मारहाण करून त्यांच्यावर प्राणघातक शस्त्राने हल्ला केला होता. त्यानंतर त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यावेळी याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल साडेतीन महिन्यानंतर आज (शुक्रवारी) याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील करत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar murder news
Crime News : गुऱ्हाळातील उसाच्या रसात भाजलेल्या कामगाराचा नदीत फेकून खून

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news