Food Safety Vaijapur: कचोरीमध्ये आढळली चक्क उंदराची विष्ठा; वैजापूरमध्ये खळबळ

घटनेची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) करण्यात आली आहे
Food Safety Vaijapur: कचोरीमध्ये आढळली चक्क उंदराची विष्ठा; वैजापूरमध्ये खळबळ
Published on
Updated on

नितीन थोरात

वैजापूर : शहरातील खाद्यपदार्थांच्या दुकानांमधील स्वच्छता आणि गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डेपो रोड परिसरातील एका मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेल्या कचोरीमध्ये चक्क उंदराची विष्ठा आढळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

Food Safety Vaijapur: कचोरीमध्ये आढळली चक्क उंदराची विष्ठा; वैजापूरमध्ये खळबळ
Chhatrapati Sambhajinagar illegal plotting : वक्फच्या १२ एकर जागेतच काढले तब्बल ३८० प्लॉट्स

कचोरीमध्ये उंदराची विष्ठा आढळल्यानंतर संतप्त झालेल्या ग्राहकाने संबंधित दुकानात जाऊन आपला रोष व्यक्त केला. या घटनेची माहिती परिसरात पसरताच दुकानाबाहेर नागरिकांची गर्दी झाली. दरम्यान, या प्रकारानंतर संबंधित दुकान काही काळ बंद करण्यात आले. घटनेची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) करण्यात आली असून, प्रशासनाकडून या प्रकरणाची तपासणी केली जाणार आहे.

Food Safety Vaijapur: कचोरीमध्ये आढळली चक्क उंदराची विष्ठा; वैजापूरमध्ये खळबळ
Chhatrapati Sambhajinagar crime : अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा तरुण अटकेत

खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेची योग्य काळजी घेतली जाते की नाही, याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. FDAच्या तपासणीत या प्रकारामागचे नेमके कारण काय समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news