

वैजापूर : तालुक्यातील चोर वाघलगाव परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेने एकच खळबळ उडाली. विद्युत तारेला स्पर्श झाल्यानंतर हायवा आणि स्विफ्ट कारला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच दोन्ही वाहनांना आगीने वेढून टाकले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला गेलेल्या हायवा वाहनाचा वरचा भाग विद्युत तारेला लागला. स्पार्क होऊन आग भडकली आणि हायवाबरोबरच शेजारी उभी असलेली स्विफ्ट कारही आगीत सापडली. क्षणात दोन्ही वाहने जळू लागल्याने परिसरात गोंधळ उडाला.
घटनास्थळी तातडीने गावकऱ्यांनी पोलिसांनी तातडीने धाव घेत, अग्निशामक दलाला प्रसारण करण्यात आले व आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येई पर्यंत दोन्ही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे . पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.