छत्रपती संभाजीनगर : कर्णपुऱ्यातून घरी जाताना दुचाकी कठड्याला धडकून दोन तरुण ठार

file photo
file photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कर्णपुरा यात्रेतून देवीचे दर्शन घेऊन घरी जाणाऱ्या तरुणाची दुचाकी टाऊनहॉल उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून भीषण अपघात झाला. यात दोघे तरुण जागीच ठार झाले. २२ ऑक्टोबरला मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली.

आनंद वसंत शिंदे (३०), राहुल विश्वनाथ साठे (३५, दोघे रा. शताब्दीनगर) अशी मृतांची नावे आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी दिली.

अधिक माहितीनुसार, आनंद आणि राहुल हे दोघे मजुरी करायचे. ते चांगले मित्र होते. ते दोघे दुचाकीने (क्र. एमएच-२०-जीएन- ५९१८) कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन यात्रा झाल्यावर मध्यरात्री ते दुचाकीने घराकडे निघाले. मिल कॉर्नर, भडकल गेट मार्गे टाऊन हॉल उड्डाणपुलावरून ते शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या दिशेने जात असताना टाऊन हॉल उड्डाणपुलावर त्यांची दुचाकी रस्त्याच्या कठड्याला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकी रस्त्याच्या एका बाजूला फेकली गेली, तर त्यावरील दोन्ही तरुण वेगवेगळ्या दिशांना दूर फेकले गेले. दोघांचे डोके रस्त्यावर आदळल्यामुळे प्रचंड रक्तस्राव झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक हिवराळे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news