छत्रपती संभाजीनगर : सोलापूर-धुळे मार्गावर चारचाकीच्या धडकेत दोघेजण ठार

छत्रपती संभाजीनगर : सोलापूर-धुळे मार्गावर चारचाकीच्या धडकेत दोघेजण ठार
Published on
Updated on

हतनूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड तालुक्यातील हतनूर येथे चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला. आज सायंकाळी (दि १०) हाअपघात झाला.

हतनूर (ता कन्नड)येथील पेट्रोल पंप सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर कन्नडकडून चारचाकीने (एम एच ०९ एफ बी ५७५७) छत्रपती संभाजीनगरकडे जात होते, तर दुचाकी (एम एच २० जी जी ७३६२) चुकीच्या दिशेने कन्नडकडे येत होती. यावेळी समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील गणेश भवर (वय ३५ वर्ष रा.शिरोडी ता. कन्नड) यांचा जागीच मृत्यू झाला तर शंकर सोनवणे (वय ३२ वर्ष रा.शिरोडी ता कन्नड) हे गंभीर जखमी असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, गंभीर जखमीला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

यावेळी अपघातस्थळी पोहकॉ कैलास करवंदे, बीट जमादार संदीप आटोळे, अमोल सावंत, सागर काटकर, रामेश्वर वेताळ, सलमान शेख यांनी अपघातात मृत्यू झालेल्या व जखमी ला उपचारासाठी रुग्णालयात पोहचविण्यास मदत केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news