छ.संभाजीनगर : आईचा खून करणाऱ्याच्या डोक्यात मुलाने घातले कुऱ्हाडीचे घाव

वडवळी येथील घटना; जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू
Chhatrapati Sambhajinagar murder News
आईचा खून केल्याचा राग मनात धरून मुलाने कुऱ्हाडीने संशयितावर हल्ला केला. Pudhari File Photo
Published on
Updated on

पैठण : तालुक्यातील वडवळी येथे आईच्या खूनाचा बदला घेण्यासाठी मुलाने एकाच्या डोक्यात कुऱ्हाडीचे तीन घाव घालून त्याला गंभीर जखमी केले. महादेव विनायक मैदंड (वय ४० रा. वडवळी ता.पैठण) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Chhatrapati Sambhajinagar murder News
इगतपुरी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा भरदिवसा खून

पैठण तालुक्यातील वडवळी येथील महादेव विनायक मैदंड यांने त्याच्या घरासमोर रस्त्यावर लाकडं टाकून रस्ता अडविल्याने परमेश्वर कोरडे व महादेव मैदंड यांच्यात वाद झाला. महादेव मैदंड याने २० डिसेंबर २०२१ रोजी परमेश्वर कोरडे याच्या आईचा खून केला होता. याचा राग मनात धरून कोरडे याने महादेवच्या डोक्यात तीन कुऱ्हाडीचे घाव घालून त्याला गंभीर जखमी केले, त्यानंतर जखमी महादेव मैदंड याला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची खबर मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि सिद्धेश्वर गोरे यांनी घटनास्थळ भेट देऊन पंचनामा केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news