

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने मार्चएण्डमुळे शहरात मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. यात १ लाखाहून अधिक कराची थकबाकी असलेल्या मालमत्तांना सील ठोकण्यात येत आहे. यात शुक्रवारी झोन = क्रमांक ५ च्या पथकाने चिकलठाणा - एमआयडीसीतील देवगिरी टेक्सटाईल - मिल कंपनीला सील ठोकले. त्यांच्याकडे मालमत्ता करापोटी थकीत ३ कोटी ७ लाख रुपये थकले आहेत. याशिवाय झोन २, १० आणि ४ मधील पथकाने एमएसईबीच्या फ्यूज कॉल सेंटरसह विविध ठिकाणची पाच दुकाने सील केली.
महापालिका निवडणुकीनंतर कर मूल्य निर्धारक व संकलक विभागाचे उपायुक्त विकास नवाळे यांनी पुन्हा कर वसुलीच्या धडक मोहिमेला सुरुवात केली आहे. मार्चएण्डमुळे महिनाभरात किमान २०० कोटींची वसुली करून ४०० कोटींचे उद्दिष्ट गाठण्याकडे प्रशासनाने लक्ष - केंद्रित केले आहे.
या मोहिमेत शुक्रवारी झोन-५ कार्यालयांतर्गत एन-९ के सेक्टरमधील दुकान क्रमांक २२ चा १ लाख २४ हजार ९०६ रुपयांचा कर थकला होता. यासाठी पथकाने मालमत्ताधारक सांगोले यांचे दुकान सील करण्यात आले. तर याच झोन कार्यालयाअंतर्गत दुसर्या पथकाने चिकलठाणा एमआयडीसीतील देवगिरी टेक्सटाईल मिलकडे ३ कोटी ७ लाख २४ हजार २६ रुपयांचा कर थकल्याने कंपनीला सील ठोकण्यात आले.
झोन क्रमांक २ मध्ये चौराह येथील मालमत्ताधारकाकडे १ लाख ११ हजार ५७ रुपयांचा कर थाकल्याने मालमत्ता सील केली. एन-१२ येथील राज हाईटमधील फ्यूज कॉल सेंटरकडे ५ लाख ६६ हजार आणि दुसऱ्या दुकानाचा ५ लाख ५८ हजार कर थकल्याने दोन्ही दुकाने सील केली.
झोन क्रमांक १० मध्ये कांचनवाडीतील व्यावसायिक मालमत्ताचा ३६ लाख ७५ हजार रुपये कर थकल्याने तसेच या परिसरातील दुसर्या मालमत्ताधारकाकडे १ लाख १८ हजार कर थकल्याने सील करण्यात आल्या आहेत. या सातही मालमत्तांवर महापालिका अधिनियमाचे नियम ४२ च्या पोट कलम १ नुसार कारवाई करण्यात आली आहे.