Chhatrapati Sambhajinagar Crime | सहा महिन्यांपासून अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद

गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे डोंगरगावातून अटक; पिशोर पोलिसांची यशस्वी कारवाई
Chhatrapati Sambhajinagar Absconding Accused Arrested
सुभाष आंग्रे याला डोंगरगाव येथून ताब्यात घेण्यात आलेPudhari
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Absconding Accused Arrested

पिशोर : पिशोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचार प्रकरणातील तब्बल सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पिशोर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत सुभाष किसन आंग्रे (वय ३८, रा. डोंगरगाव, ता. कन्नड) याला डोंगरगाव येथून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सतत फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पिशोर पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. दरम्यान, आरोपीच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचे ठिकाण निश्चित करण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी डोंगरगाव येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधित गुन्ह्यात त्याला विधिवत अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Chhatrapati Sambhajinagar Absconding Accused Arrested
Chhatrapati Sambhajinagar News : वाहनांच्या बोगस फिटनेसला आता लगाम

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री (कन्नड उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे, सहायक फौजदार सय्यद, पोलीस हवालदार परमेश्वर दराडे, पोलीस कॉन्स्टेबल करण म्हस्के, पवन खंबाट, गणेश कव्वाल, घुनावत तसेच महिला पोलीस शिपाई घुले यांनी सक्रिय सहभाग घेत आरोपीला अटक करण्याची कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news