

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. टायपिंग परीक्षेत अपयशी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय सोमवारी (दि.१०) मनपा प्रशासकांनी घेतला आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र या परीक्षेत अपयशी ठरल्यास जुन्या पदावर परत पाठवले जाणार आहे.
महापालिकेने यापूर्वी पदोन्नतीनंतर घेतलेल्या टायपिंग परी क्षेत अनेक कर्मचारी नापास ठरले होते. त्यामुळे त्यांचे पद स्थिर न राहता अनिश्चिततेत गेले होते. अखेर सोमवारी प्रशासकांनी कर्मचाऱ्यांचा विचार करून पुन्हा एकदा परीक्षा देण्याची मुभा दिली आहे. मात्र या परीक्षेत पुन्हा नापास ठरल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या पदावरच पुनर्नियुक्त करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मनपा प्रशासनाकडून यासंदर्भात लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाणार असून, पात्र कर्मचाऱ्यांना नोटीसद्वारे कळविण्यात येईल. या निर्णयामुळे शहरातील विविध विभागांतील कारकून, लिपिक, तसेच लघुलेखक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, मनपा कर्मचाऱ्यांनी प्रशासकांच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, सेवेत अनेक वर्षे काम करूनही केवळ टायपिंग परीक्षेमुळे पदोन्नती थांबणे अन्यायकारक होते. प्रशासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आणि न्याय्य असल्याची भावना अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल