

छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे अध्यक्ष खासदार बॅ. असदुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्र राज्याची नवीन कार्यकारिणी शनिवारी (दि.२१) जाहीर केली. यात प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा माजी खासदार इम्तियाज जलील यांची वर्णी लावण्यात आली आहे. तर पूर्व मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले एमआयएमचे जिल्हाध्यक्ष समीर साजेद बिल्डर यांना बढती देत प्रदेश सचिवपदी नियुक्ती दिली आहे.
एमआयएमला यंदा लोकसभेसह महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पराभवाचाच सामना करावा लागला छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमला दोन्ही निवडणुकीत अपयशच आले. यातून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाहेर पडून नव्या जोशाने पक्ष बळकटीचे काम सुरू करावे यासाठी एमआयएमने माजी खासदार जलील यांच्याकडे राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले माजी जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर यांना प्रदेश महासचिवपदी बढती दिली आहे.
प्रदेश कार्याध्यक्षपदी शाब्दी एम. एफ. फारुक, प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसूफ पुंजानी, गोवंडी येथील अतिक अहेमद खान यांना प्रदेश महासचिव, प्रदेश सहसचिव मुंबई येथील सैफ पठाण, पिंपरी चिंचवड येथील सैफुल्लाह पठाण यांची नियुक्ती केली आहे.