जैसा खायेगा अन्न, वैसा बनेगा-मन : महंत रामगिरी महाराज

सद्‌गुरु गंगागिरी महाराज यांच्या हरिनाम सप्ताहाला लाखोंची गर्दी
Chhatrapati Sambhajinagar News
जैसा खायेगा अन्न, वैसा बनेगा-मन : महंत रामगिरी महाराजFile Photo
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Mahant Ramgiri Maharaj Harinam week

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : आपण जे खातो त्याचप्रमाणे आपली मन-बुद्धी बनत असते. मानवाचा आहार हा शाकाहार असून, तो सात्विक असावा. जैसा खायेगा अन्न, वैसा बनेगा मन, म्हणून मनुष्याचे आचरण विचार शुद्ध असावेत, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले. शनिदेव गाव येथे सुरू असलेल्या योगीराज सद्‌गुरु गंगागिरी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहात लाखो भाविकांना त्यांनी मार्गदर्शन केले.

Chhatrapati Sambhajinagar News
Sonali lioness: दूधभात खाणारी सिंहीण, बेडवर झोपायची; पुण्यातील बागेत आल्यावर ‘सोनाली’ने जेवण सोडलं होतं, वाचा किस्सा

अखंड हरिनाम सप्ताह वैजापूर तालुक्यातील शनि देवगाव येथे सुरू असून रोज अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर सह राज्यातील भाविकांची अलोट गर्दी होत आहे. पाचव्या दिवशी ४ ते ५ लाख भाविकांनी सप्ताहास हजेरी लावली. ज्याप्रमाणे मधमाशी विविध फुलातील मकरंद गोळा करत त्यापासून मध बनवते याप्रमाणेच सद्गुरूंच्या परंपरेतील आमटी भाकरीचा महाप्रसाद अमृतसम आहे.

गोर गरीब, लहान थोर, विविध ाजांनी भजनाच्या जाती धर्मातील घराघरातून सप्ताहात येणाऱ्या भाकरी मंत्रोपचारात भक्तिमय वातावरणात तयार होणारी आमटी या महाप्रसादाचा लाभ लाखो भाविक घेतात. भगवद्‌गीतेतील अकराव्या अध्यायातील श्लोकावर विवेचन करताना महाराज म्हणाले की मन बुद्धीच्या पलीकडे अध्यात्म ज्ञान भगवंत पाहायला मिळतो. आपले मन, बुद्धी याचे शुद्धीकरण करावे लागेल. आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या आहे. साधू संताच्या संगतीत, ज्याप्रमाणे परिसाचे स्पर्शान लोखंडाचे सोने होते.

Chhatrapati Sambhajinagar News
Sambhajinagar News :'बाग बनी बेगम' स्मारकाचे प्रवेशव्दार पाच वर्षांनंतर उघडले

त्याचप्रमाणे आपल्या मन बुद्धीचेही शुद्धीकरण होते. सद्गुरू योगीराज गंगागिरी महार सप्ताहाच्या माध्यमातून मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्तोत्र पठण, ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे. नामस्मरणामुळे परमशांती मिळते. निरंतर नामस्मणामुळे कुळाची परंपरा शुध्द होते. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ-वेळेचे बंधन नाही. भक्ताचे सर्व दोषहरण करुन नाम त्याला दोष मुक्त करते, म्हणून जड जीवांना तारणारे नामस्मरणच आहे. त्यामुळेच अखंड हरिनाम सप्ताह योगीराज गंगागिरी महाराजांनी २०० वर्षांपूर्वी सर्वसामान्यांसाठी गाव गावी सुरू केले.

याप्रसंगी विरोधी पक्षनेते आबांदास दानवे, खासदार संदिपान भुमरे, आमदार रमेश बोरणारे, आमदार हेमत ओगले, माजी सभापती अविनाश गंलाडे, माजी सभापती बाबासाहेब जगताप, करण ससाणे सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज, शिवगिरी आश्रमाचे संदीपान महाराज, योगानंद महाराज, विकम महाराज, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर मधुकर महाराज यांच्यासह लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांची उपस्थिती होती.

शेकडो एकर परिसरातील कृषी प्रदर्शन

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र गोदाधाम सरला बेटाचा वारकरी भाविक भक्त हा शेतकरी कुटुंबातील किंवा शेतीशी निगडित आहे. प्रत्येक वर्षी सप्ताहामध्ये कृषी प्रदर्शन भरवल्या जाते. शनिदेव गाव येथील १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहात शेकडो एकर परिसरात भव्य असे कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. ३०० च्या वर विविध कंपन्यांचे शेती, अवजारे, आधुनिक तंत्रज्ञान विविध मशिनरी व कृषी निगडित तंत्रज्ञान येथे उपलब्ध आहेत. सप्ताहातील ज्ञानदान अन्नदानाबरोबरच कृषी ज्ञान ही वारकरी, शेतकरी घेत आहेत. दरम्यान, सप्ताहकाळात गर्दी कायम राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news