Chhatrapati Sambhajinagar gas shortage : गॅस एजन्सींवर आता सरकारी कर्मचारी नियुक्त

जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक ठेवणार लक्ष
Gas Shortage
Gas ShortagePudhari
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : घरगुती गॅस सिलिंडरसाठी शहरातील विविध गॅस वितरक एजन्सीवर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. बुकिंग केलेले हजारो ग्राहक वेटींगवर आहेत. यावर आता जिल्हा प्रशासनाने तोडगा काढला असून शहरातील प्रत्येक गॅस एजन्सीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक संवर्गातील एक कर्मचारी हा कार्यालयीन वेळेत नियुक्त असणार आहे. यामुळे गॅस वितरण कंपनी, एजन्सींच्या कारभारावर लक्ष राहून ग्राहकांना दिलासा मिळण्याची आशा आहे.

आखाती देशातील युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. घरगुती गॅसचा पुरवठाही विस्कळीत झाल्याने शहरातील गॅस एजन्सींवर टंचाई आणि अफवांमुळे ग्राहकांची गर्दी वाढतच आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शहरातील २३ गॅस एजन्सींवर महसूल विभागाचा प्रत्येकी एक लिपिक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Gas Shortage
kolhapur | गॅस सिलिंडरसाठी धावाधाव

हा कर्मचारी नागरिकांच्या समस्या काय आहेत ? त्यांच्या मोबाईलवर ओटीपी येतो का? नाही आल्यास पर्यायी व्यवस्था काय आहे? ती व्यवस्था काम करते का? यांसह नियमानुसार गॅस सिलिंडर वितरित होते का? याची पाहणी करणार आहे.

तीन एजन्सींचे साडे अकरा लाख ग्राहक

जिल्ह्यात ११ लाख ७७ हजार गॅस सिलिंडरधारक ग्राहक आहेत. यामध्ये एचपीसीएलचे दोन लाख ४० हजारापेक्षा अधिक तर बीपीसीएलचे तीन लाख ४० हजारापेक्षा अधिक आणि आयओसीएलचे तीन लाख ६० हजारांहून अधिक ग्राहक आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली.

Gas Shortage
घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवा; जिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news