

सिल्लोड : राज्यातील भाजपा महायुती सरकारने निवडणूक होताच काही दिवसाच्या आत सरकार जनविरोधी एसटी बसची प्रचंड भाडेवाढ करून सामान्य नागरिकांना आर्थिक संकटाच्या खाईत लोटण्याच्या पापाला प्रारंभ केले आहे.जाहीर केलेली एसटी भाडे वाढ तात्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने २७ जानेवारी रोजी राज्यभर पुकारलेल्या रस्ता रोको आंदोलनाच्या अनुषंगाने सिल्लोड शहरातील एसटी बस स्थानकासमोर रस्त्यावर शिवसैनिकांनी रस्ता रोको करून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे यांच्या नेतृत्वात रस्ता रोको चक्काजाम अनुदान केले.
आंदोलकांसमोर बोलताना रघुनाथ घरमोडे म्हणाले राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार गोरगरीब सामान जनता कामगार शेतकरी शेतमजुरांच्या विरोधातील मुठभर उद्योगपतींच्या इशाऱ्यावर नाचणारे उद्योगपतींच्या साठी काम करणारे सरकार आहे. सामान्यांच्या खिशाला न परवडणारी व न झोपणारी एसटी भाडेवाढ सरकारने तात्काळ रद्द करावी तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा, सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करून द्यावा, मुठभर उद्योगपतींची चाकरी सरकारने थांबवावी आदी विविध मागण्यांचे निवेदन एसटी आगारप्रमुख संजय कळवणे यांना दिले आहे.
या वेळी तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, तालुका संघटक भास्कर आहेर, संजय पा. कळात्रे, शहरप्रमुख मच्छिंद्र धाडगे, उपतालुकाप्रमुख शिवा गौर, राहुल वाघ, शेख सद्दाम, सागर वाळके, राजु सिरसाठ, सिंघम तायडे, सोमिनाथ सोनवणे, सुनिल पंडीत, रामधन कायटे आदींचा आंदोलनात सहभाग असल्याची माहिती तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे यांनी दिली आहे.
सिल्लोड - सोयगाव विधानसभा मतदारसंघातील नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत उमेदवार असलेले या आंदोलनात गायब झाले होते. यावेळी आंदोलनात केवळ निष्ठावान शिवसैनिकच दिसून आले. आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसैनिक पेक्षा सहभागी न झालेल्या निवडणुकीतील शिवसैनिकांची चर्चाच अधिक झाली.