छ. संभाजीनगर : हनी ट्रॅपमध्ये व्यापाऱ्याला २० हजारांचा गंडा; टोळी गजाआड

गुलमंडी परिसरातील घटना
honey trap
प्रसिद्ध व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून २० हजारांची रक्कम उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली.File Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : प्रसिद्ध व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून २० हजारांची रक्कम उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी मंगळवारी (दि.२८) अटक केली. या प्रकरणात एका महिलेचा सहभाग असल्याचे समोर आले असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुलमंडी परिसरात ही घटना घडली होती.

सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी चौक पोलिसांनी ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार,सर्व आरोपी हे भावसिंगपुरा परिसरातील राहणारे आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींकडून एक शस्त्र जप्त झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सिटी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news