Rudreshwar Waterfall Collapse | मुसळधार पावसामुळे रुद्रेश्वर लेणीतील धबधब्यातील दगडांचा काही भाग कोसळला

Chhatrapati Sambhajinagar Rain | लेणी परिसरातील नैसर्गिक सौंदर्याला धक्का
Rudreshwar caves  waterfall collapse
रुद्रेश्वर लेणीमधून वाहणाऱ्या धबधब्याचा काही भाग कोसळून कुंडामध्ये पडला (Pudhari Photo)
Published on
Updated on

Rudreshwar caves waterfall collapse

गलवाडा वाडी, सोयगाव: सोयगाव तालुक्यातील गलवाडा वाडी शिवारामधील ऐतिहासिक आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रुद्रेश्वर लेणी परिसरात रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठा अनुचित प्रकार घडला आहे. लेणीमधून वाहणाऱ्या धबधब्याचा काही भाग कोसळून थेट खालील कुंडामध्ये पडला.

या घटनेमुळे लेणी परिसरातील नैसर्गिक सौंदर्याला काहीसा धक्का बसला असून, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Rudreshwar caves  waterfall collapse
Marathwada Railway | रेल्वे प्रवासातील वळसा कधी थांबणार? सोलापूर-बीड-छत्रपती संभाजीनगर नवीन रेल्वे 'मार्गाकडे सर्वांचे लक्ष

स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, परिसरात सुरक्षा कारणास्तव काही काळ बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. भू-गर्भ तज्ज्ञांच्या मदतीने या घटनेच्या मूळ कारणांची चौकशी करण्यात येणार आहे.

रुद्रेश्वर लेणी ही या भागातील एक महत्वाची पर्यटनस्थळ असून, नैसर्गिक धबधबा आणि प्राचीन लेण्यांमुळे वर्षभर पर्यटक येथे भेट देतात. परंतु, दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा जोर वाढत असल्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने नागरिकांनी आणि पर्यटकांनी लेणी परिसरात खबरदारीने वावरण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news