Chhatrapati Sambhajinagar theft : बाप्पाच्या स्वागताच्या गर्दीत चोरट्यांची हातसफाई; शहरात ४० हून अधिक मोबाईल, ६ मंगळसूत्र लंपास

गर्दीमध्ये नागरिकांनी मौल्यवान वस्तूंबाबत अधिक काळजी घेण्याची गरज
Chhatrapati Sambhajinagar theft
Chhatrapati Sambhajinagar theftpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : गणरायाच्या आगमनानिमित्त सोमवारी (दि.१४) शहरातील बाजारपेठा आणि रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपले हातसफाईचे कसब दाखवले. विविध भागांतून तब्बल ४० हून अधिक मोबाईल आणि ६ महिलांचे मंगळसूत्र चोरटयांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. शहरातील मुख्य बाजारपेठा, टीव्ही सेंटर आणि क्रांती चौक परिसरात मोबाईल चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला.

सिटी चौक: या हद्दीत ४ मोबाईल चोरीला गेले. नागरिकांनी एका चोराला रंगेहाथ पकडले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, त्याच्या ताब्यातून दोन मोबाईल जप्त केले आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, सिटी चौक पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी ७ ते ८ नागरिकांनी धाव घेतली होती.

Chhatrapati Sambhajinagar theft
Sambhajinagar Ganeshotsav 2026 : ताशाचा आवाज तररर झाला... बाप्पांचे धूमधडाक्यात आगमन

सिडको ठाणे हद्द : टीव्ही सेंटर परिसरात उसळलेल्या गर्दीत अनेकांचे मोबाईल चोरीला गेले. मात्र, चोरीच्या प्रमाणापेक्षा तक्रारींची संख्या कमी दिसली. सिडको ठाण्यात रात्री उशिरापर्यंत केवळ तीनच जणांनी मोबाईल चोरीची नोंद केली.

क्रांती चौकः एसबी महाविद्यालय रोड आणि झेडपी मैदान परिसरातून गणपती पाहण्यासाठी आलेल्या अंदाजे ८ ते १० जणांचे मोबाईल चोरट्यांनी गर्दीत लांबवल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.

सहा महिलांचे मंगळसूत्र लंपास

एकीकडे मोबाईल चोरटे सक्रिय असताना, दुसरीकडे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवणाऱ्या टोळ्यांनीही या गर्दीचा अचूक फायदा घेतला.

  • मुकुंदवाडीः मुकुंदवाडी ठाण्याच्या हद्दीत गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तीन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र कापून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.

  • जवाहरनगर : जवाहरनगर हद्दीतील गजानन महाराज मंदिर परिसर आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या ३ महिलांचे मंगळसूत्र चोरट्यांनी अत्यंत शिताफीने लंपास केले.

Chhatrapati Sambhajinagar theft
Chhatrapati Sambhajinagar Crime : लग्नास नकार दिल्याने महिलेवर चाकूहल्ला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news