Chhatrapati Sambhajinagar Bribe | लाकडाच्या गाडीवरील कारवाई टाळण्यासाठी लाच; वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

सात हजारांची मागणी, तडजोडीनंतर पाच हजार रुपये स्वीकारले
Chhatrapati Sambhajinagar Bribe | लाकडाच्या गाडीवरील कारवाई टाळण्यासाठी लाच; वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Chhatrapati Sambhajinagar Bribe | लाकडाच्या गाडीवरील कारवाई टाळण्यासाठी लाच; वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Published on: 
Updated on: 

कन्नड : लाकडाची वाहतूक करणाऱ्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी सात हजार रुपयांची लाच मागून, तडजोडीनंतर पाच हजार रुपये स्वीकारल्याच्या आरोपावरून कन्नडचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी नागनाथ टोम्पे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दी. १६) पकडले. कन्नड तहसील कार्यालयाच्या आवारात दुपारी ही कारवाई करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लाकूड खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या व्यवसायातील लाकडाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी टोम्पे यांनी सात हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने १४ ऑक्टोबर रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्याने सात हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर पाच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे एसीबीच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार, शुक्रवारी कन्नड तहसील कार्यालयाच्या आवारात सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान टोम्पे यांनी तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप असून, एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी कांजणे आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक मनोज सोनवणे, प्रतीक्षा आबुज तसेच पोलीस अंमलदार अशोक नागरगोजे, रामेश्वर गोरे, सचिन बारसे आणि रामेश्वर ताठे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, याप्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news